देवी रक्षति रक्षित:

पुस्तकाचे नाव - देवी रक्षति रक्षित:
लेखिका - सौ. सरिका कंदलगावकर
प्रकाशक - सदिच्छा पब्लिशिंग हाऊस 




पौराणिक कथा, आख्यायिका, दंतकथा, अध्यात्म, या सगळ्याचा संदर्भ वर्तमानाशी जोडून एक थरारक, गुढरम्य, वेगवान कथानक  वाचकांचा ताबा घेते. हे कथानक आध्यात्मिक, पौराणिक, पार्श्वभूमीवर असले तरीही यातील सगळी पात्रे वर्तमानातील आहे.

शांभवी ही पुरातत्व खात्यात काम करणारी जेमतेम पंचवीशीची तरुणी. थोडीफार सुबत्ता आणि आई वडीलांच्या सुरक्षित पंखाखाली धाकट्या भावासोबत राहणारी.

एका किरकोळ अपघाताचे निमित्त होऊन तिच्या आयुष्यात कपील हा पत्रकार तरुण येता. तो देवीच्या शक्तिपीठा़ची माहिती गोळा करीत असतो.

त्याचवेळी काही विचित्र अनाकलनीय घटना घडू घडतात. शांभवीचे  आईवडील लगेच राहती जागा, शहर सोडून दुसरीकडे जाण्याचं ठरवतात. त्यांना कसलीतर भिती वाटत असते. त्यांच्यासाठी कोणाही पेक्षा शांभवीचे सुरक्षित राहणे जास्त महत्वाचे असते.याला कारणीभूत असणारे तिचे बालपण आणि भुतकाळातील काही रहस्ये उघड करण्याअगोदरच तिच्या आईवडिलांचा अपघाती मृत्यू होतो.तो खरच अपघात की घातपात याचा तपास करताना पोलीस तिलाही संशयीत ठरवतात. तिला अटक करण्याच्या तयारीत असतांना  एकट्या असहाय्य शांभवीला तिचा पत्रकार मित्र कपील मदत करतो. आणि शांभवीच्या वडिलांनी जी थोडीफार माहिती सा़गीतली होती त्याच्या आधारे सुरू होते एक शोधयात्रा. धाकटा भाऊ आणि जिवलग मैत्रिणी सोबत येतात.

तिच्या आईवडिलांनी सांगीतलेलं एक अर्धवट रहस्य ज्याचा उल्लेख एक दिवस अगोदर केलेला असतो. या रहस्याचे उत्तर शोधण्यासाठी देवीच्या शक्तिपीठे अभ्यासणे गरजेचे होते. तिथूनच या रहस्याची उकल होणार होती. शांभवी, कपील, तिचा भाऊ आणि मैत्रिणीसह शक्तिपीठांचा प्रवास करीत असतांना काही वेळा तिच्या पुरातत्व ऑफीस मधला तिचा बाॅस  अचानकपणे येतो समोर येतो. ती अजुनच गोंधळुन जाते.

मात्र आपल्यामधे काहीतर वेगळं आहे याचीही जाणीव होऊ लागते. आणि स्वतःच्या अस्तित्वाची नव्याने ओळख होऊ लागते.

पौराणिक व धार्मिक कथा दंतकथा आख्यायिका याचा वापर करुन शक्तिपीठांचा इतिहास, भौगोलिक स्थान,त्याचे महत्त्व, दहा महाविद्या, नवनाथ आणि नाथ संप्रदायाची परंपरा याची कथानकाच्या ओघात आलेली माहिती प्रभाव तर पाडतेच, शिवाय गुढ वातावरण निर्मीतीला मदतही करते. शिवाय यातून  उपासना पध्दतीच्या वेगवेगळ्या परंपरेची ही माहिती मिळते.

भाषाशैली ओघवती व नाट्यमय आहे. संवादप्रधान असली तरीही घटनांचे वर्णन इतके स्पष्ट व जिवंत आहेत की त्यातला संपूर्ण थरार अनुभवता येतो.

कादंबरीचे शीर्षक देवी रक्षति रक्षित: जो देवीचे रक्षण करतो, देवी त्याचे रक्षण करते. हे कथानकाच्या मूळ गाभ्याला न्याय देणारे आहे.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.