मंडळाच्या नियतकालिकांत आणि अन्यत्रही त्यांनी बरेच स्फुट लेखन केले आहे. मराठी गद्याचा इंग्रजी अवतार (१९२२) हा त्यांचा ग्रंथ अव्वल इंग्रजीच्या कालखंडातील (१८१०– ७४) मराठी साहित्येतिहास लिहिण्याचा प्रारंभीचा प्रयत्न म्हणून उल्लेखनीय आहे. ह्या कालखंडातील मराठी गद्याच्या जडणघडणीचे दत्तो वामन पोतदार (५ ऑगस्ट १८९०–६ ऑक्टोबर १९७९) थोर इतिहाससंशोधक, मराठी लेखक आणि शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांतील कार्यकर्ते. प्राचीन मराठी साहित्य आणि मराठ्यांचा इतिहास ह्या विषयांचा त्यांचा विशेष व्यासंग. तत्संबंधी भारत इतिहास संशोधक 

सप्रमाण दर्शन या ग्रंथात घडविण्यात आले आहे. महाराष्ट्र-साहित्यपरिषद्-इतिहास, वृत्तविभाग व साधन विभाग (१९४३) ह्या त्यांच्या पुस्तकात मराठी साहित्यिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आरंभीच्या कालखंडातील कार्याची माहिती आहे. त्यांनी संपादिलेल्या लहानमोठ्या ग्रंथांतील देवदासकृत संतमालिका (१९१३) आणि श्रीशिवदिनकेसरि विरचित ज्ञानप्रदीप (१९३४) हे विशेष उल्लेखनीय होत.
भाषिक प्रश्नासंबंधीचे त्यांचे लेख भारताची भाषासमस्या (१९६८) ह्या पुस्तकात संकलित करण्यात आले आहेत. श्री थोरले माधवरावसाहेब पेशवे (१९२८), मराठी इतिहास व इतिहास-संशोधन विहंगम निरीक्षण) (१९३५), दगडांची कहाणी हे पोतदारांचे अन्य काही उल्लेखनीय ग्रंथ. महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपतींच्या चरित्रलेखनाचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. केंद्र शासनाने ‘महामहोपाध्याय’ ही पदवी दिली (१९४८).
हिंदी साहित्यसंमेलनाने त्यांना ‘साहित्यवाचस्पति’ ही उपाधी प्रदान केली. वाराणसेय विश्वविद्यापीठ व पुणे विद्यापीठ यांनी डि.लिट्. पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. १९३९च्यि अहमदनगर मराठी साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९२२मध्ये भारतीय ऐतिहासिक अभिलेख आयोगाच्या मुंबई बैठकीस स्वीकृत सदस्य म्हणून निमंत्रित करण्यात आले. ( संदर्भ - मराठी विश्वकोश)