वा.रा.कांत-By प्रविण कलंत्री


Image

 वा.रा.कांत ( ६ आक्टोबर १९१३ - ८ सप्टेंबर १९९१ ) मराठीमध्ये ६० व ७० च्या दशकात भावगीत हा भावनाप्रधान काव्यरचनेचा प्रकार आला, रुळला, आणि लोकप्रिय झाला. वा रा कांत हे त्या वेळच्या अग्रणी भावगीतकारांपैकी एक. 'बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात','त्या तरुतळी विसरले गीत', 'सखी शेजारीनी' यासारखी आजारावर भावगीते त्यांनी लिहिलीरुद्रवीणेतील विशुद्ध प्रेमकविता त्यांच्या प्रतिभेचे मनोज्ञ दर्शन घडवते.सांगीतिकेपेक्षा भिन्न, गाण्याचे अंग नसलेला, व्यक्तिचित्रण आणि संवादशैली यांच्या एकत्रीकरणातून जीवनविषयक दृष्टीकोन साकारणारा 

Image‘नाट्यकाव्य’ नामक एक नवा, वेगळा प्रकार मराठी साहित्यात रुजवण्याचे श्रेय कांत यांना जाते. ‘दुमार’, ‘पाषाणावरील तीळ’, ‘आशिया’, ‘चुंबन’, ‘सूर्याचं वाळवंट’ आदी १६ नाट्यकाव्ये त्यांनी लिहिली. त्यांतली काही आकाशवाणी केंद्रावर गाजली. वा.रा.कांत ह्यांच्या नावावर २९ समीक्षात्मक लेख, Image


२१ ललित लेख, ‘अभिजीत’ किंवा ‘रसाळ वामन’ या टोपण नावांनी लिहिलेले ७ ललित लेख असे वाङ्मय आहे. काही कवितासंग्रहांसाठी त्यांनी प्रस्तावनाही लिहिल्या आहेत.
मराठवाडा साहित्य संमेलनात (१९५३) आणि मराठवाडा संमेलनात कविता संमेलनांचे अध्यक्षपद कांत यांनी भूषवले. 


त्यांच्या चार काव्यसंग्रहांना राज्यपुरस्कार लाभले. महाराष्ट्र राज्य साहित्य संकृती मंडळातर्फे गौरववृत्ती (१९८९), महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे व आंध्र प्रदेश, हैद्राबाद ह्यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवा सन्मान (१९८८ व १९८९) त्यांना लाभले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.