नरहर कुरुंदकर (१५ जुलै १९३२ - १० फेब्रुवारी १९८२) हे मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक, आणि समाजचिंतक होते.नरहर कुरुंदकरांच्या निधनाला ४० वर्षं झाली आहेत. आजही त्यांच्या विचारांची चर्चा होताना दिसते. त्यांचं साहित्य हे आता इंग्रजीत अनुवादित होऊन येत आहे. त्यामुळे कुरुंदकरांचे विचार प्रासंगिक आहेत हे विधान अतिशयोक्ती ठरत नाही. कुरुंदकरांच्या विचारांबरोबरच त्यांची विचारपद्धती देखील कालसुसंगत आहे.इ.स. १९६७ मध्ये ‘मागोवा’ हा त्यांचा ऐतिहासिक लेखांचा संग्रह प्रसिद्ध झाला. या ग्रंथामध्ये ‘भारतीय संगीत : एक आढावा’, ‘शाकुंतल : इतिहास, पुराण व काव्य’, ‘बेंद्रे यांचा संभाजी’, ‘कै. त्र्यं.शं. शेजवलकर’, ‘लोकायत’ हे विविध प्रकारचे संदर्भमूल्य असणारे लेख समाविष्ट आहेत. ‘जागर’ या पुस्तकामध्ये विविध विषयांवर चिकित्सक, संशोधनपर लेख आहेत. ‘शिवरात्र’ हे त्यांचे आणखी एक पुस्तक प्रसिद्ध झाले. कुरुंदकरांचे ‘धार आणि काठ’हे मराठी कादंबरीचा आढावा घेणारे, ‘पायवाट’ हे वाङ्मयसमीक्षेचे पुस्तक प्रसिद्ध झाले.कुरुंदकरांच्या मृत्युपश्चात त्यांची महत्त्वाची अशी काही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत वाटचाल, अभयारण्य, अन्वय, परिचय, वारसा,अभिवादन, रंगशाळा इत्यादी पुस्तकांचा येथे उल्लेख करता येऊ शकेल. ‘रूपवेध’ या पुस्तकाप्रमाणे ‘शिवरात्र’ आणि ‘धार आणि काठ’ या त्यांच्या ग्रंथांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय- निर्मितीचे पुरस्कार मिळाले.रूपवेध, मनुस्मृती, वाटा तुझ्या माझ्या ही इतर काही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.कुरुंदकर समाजवादाचे पुरस्कर्ते होते. समाजवाद, इहवाद, उदारमतवाद, लोकशाही यांविषयी ते कायम बोलत राहिले. सर्वांना समजेल अशा भाषेत बोलणारा, विचार प्रसृत करणारा कृतिशील विचारवंत ही त्यांची खरी ओळख होती.( विकिपीडिया)गमतीचा भाग म्हणजे कुरुंदकर तेव्हा इंटर (आताचं बारावी) पास नव्हते तेव्हा त्यांची पुस्तकं बीएला अभ्यासक्रमाला होती. ते मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते, ते बीए पास नव्हते त्याआधी ते मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटवर होते, एम. ए. पास झाले नव्हते त्याआधी त्यांचा रिचर्ड्सची कलामीमांसा हा संशोधनावर आधारित असलेला ग्रंथ आला होता. त्यावेळी ते नांदेडच्या प्रतिभा निकेतन शाळेत प्राथमिक शिक्षक होते.प्राचार्य राम शेवाळकरांनी काही काळ नांदेडच्या पीपल्स कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. त्यांचा इंटरव्ह्यू कुरुंदकरांनी घेतला होता. जेव्हा शेवाळकरांना कळलं की, आपला इंटरव्ह्यू एक शालेय शिक्षक घेणार आहे तेव्हा ते नाराज झाले.( बीबीसी मराठी)