जगणे हीसुद्धा एक कला आहे, ती आपण अवगत करायला हवी, असा संदेश वपु अगदी सहज देऊन जात असत.
वपु....
वपु....
या २ शब्दावर तमाम रसिक अजूनही प्रेम करत आहेत. त्यांचे विचार आदानप्रदान करत आहेत. वपु मुंबई महानगरपालिकेत होते. पेशाने वास्तुविशारद होते. पण वास्तू साकारताना त्यांनी किती सुंदर सुंदर पुस्तके आपल्या मराठी मातृभाषेत लिहिली याला तोड नाही. वपुंचे मराठी लिखाण सामान्य माणसाच्या जीवनाला भिडणारे, समृद्ध करणारे आहे.
आपल्या लिखाणातून जगण्याचं तत्त्वज्ञान सोप्या पण रंजक पद्धतीने सांगणारे थोर साहित्यिक म्हणजे वसंत पुरुषोत्तम काळे. ‘वपु’ या दोन अक्षरांनी महाराष्ट्राला परिचित असलेल्या व. पु. काळे यांचा वाचकविश्वात स्वतंत्र असा संप्रदाय आहे. वपुंनी ६० पेक्षा जास्त पुस्तकांचे लिखाण केलं. ऑडिओ कॅसेटमधून घराघरात पोहोचणारे वपु पहिले लेखक ठरले. पेशाने आर्किटेक्ट असणारे वपु इमारतींच्या आराखड्याचे रेखन करण्यापेक्षा लेखन करू लागले आणि मराठी साहित्याला एक थोर साहित्यिक लाभला.
व.पु. काळेंना ‘महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान’, ‘पु.भा.भावे पुरस्कार’, ‘फाय फाऊंडेशनचा पुरस्कार’ आणि अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले गेले. सोशल नेटवर्किंग साइट्सवरही वपुंच्या नावाची पाने तयार केली जातात. त्यांचे निवडक विचार, त्यांच्या पुस्तकांच्या समीक्षा या पानांवर शेअर केल्या जातात.( संकलीत)
आपल्या लिखाणातून जगण्याचं तत्त्वज्ञान सोप्या पण रंजक पद्धतीने सांगणारे थोर साहित्यिक म्हणजे वसंत पुरुषोत्तम काळे. ‘वपु’ या दोन अक्षरांनी महाराष्ट्राला परिचित असलेल्या व. पु. काळे यांचा वाचकविश्वात स्वतंत्र असा संप्रदाय आहे. वपुंनी ६० पेक्षा जास्त पुस्तकांचे लिखाण केलं. ऑडिओ कॅसेटमधून घराघरात पोहोचणारे वपु पहिले लेखक ठरले. पेशाने आर्किटेक्ट असणारे वपु इमारतींच्या आराखड्याचे रेखन करण्यापेक्षा लेखन करू लागले आणि मराठी साहित्याला एक थोर साहित्यिक लाभला.
व.पु. काळेंना ‘महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान’, ‘पु.भा.भावे पुरस्कार’, ‘फाय फाऊंडेशनचा पुरस्कार’ आणि अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले गेले. सोशल नेटवर्किंग साइट्सवरही वपुंच्या नावाची पाने तयार केली जातात. त्यांचे निवडक विचार, त्यांच्या पुस्तकांच्या समीक्षा या पानांवर शेअर केल्या जातात.( संकलीत)
साहित्यिक, लेखक म्हणून वपू महान आहेतच.
एक माणूस म्हणून वपू त्याही पेक्षा महान होते.
प्रीमियर ऑटोमोबाईल कंपनीचे उपाध्यक्ष केशव पोळ यांना आठवड्यातून दोनदा डायलिसिस घ्यावे लागत असे. त्यावेळी डायलिसिस आजच्या इतके सोपे नव्हते दोन दोन दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागत असे आणि वेदनाही भरपूर होत असे.अशावेळी त्यांची पत्नी वपु च्या कथाकथनाची कॅसेट लावीत असे.ती कथा ऐकत पोळ वेदना सहन करीत झोपी जात.
हॉस्पिटलमध्ये जाण्यायेण्याचा त्रास कमी व्हावा म्हणून पुढे प्रीमियर कंपनीने त्यांच्या घरी डायलिसिस मशीन बसवून त्यांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला तेव्हाही डायलिसिस करताना वपू च्या कथाकथनाचा कॅसेट ऐकत ते आपल्या वेदना हलक्या करीत असत.
एकदा पोळ यांच्या पत्नीने वपुंना फोन केला आणि पतीचे आजारपण आणि डायलिसिस बाबतीत सांगून तुमच्या कथाकथनाचा आणि रंगवून सांगण्याच्या शैलीचा माझ्या पतींना फार आधार वाटतो तुमच्या आवाजाने माझ्या पतीला चेहऱ्यावर स्मीत येतं हे ऐकून वपुंनी त्यांना त्यावेळेला शाब्दिक आधार दिला.
पण खास प्रसंग तर पुढेच आहे अवघ्या दोन आठवड्यानंतर पोळ सरांच्या घरी वपुंचा फोन आला ते म्हणाले "कथाकथनाच्या निमित्ताने मी पुण्याला येतो आहे आणि मला डायलिसिस मशीन ने कसं काम होतं हे बघायचं", हे ऐकल्यावर पोळांच्या घरी अगदी दिवाळीचं वातावरण झालं. कथाकथन सम्राट आपल्या घरी येणार याचं त्यांना फार अप्रूप होतं.
भल्या पहाटे चार वाजता निघून बरोबर आठ वाजता वपु पोळांच्या घरी हजर झाले.
चहापाणी झाल्यावर डायलिसिसची तयारी सुरू झाली आणि पोळ्यांच्या पत्नीने कॅसेट टेप रेकॉर्डर मध्ये टाकून खटका दाबताच वपु जागेवरून उठले, पोळापाशी आले आणि म्हणाले, "आज कॅसेट नाही तर व पु स्वतः तुमच्याजवळ बसून तुम्हाला नवीन कथा सांगतील"
हे ऐकून सगळेच भारावून गेले नंतर वपुंनी कथा सांगायला सुरुवात केली आणि सांगता सांगता ते पोळांचे पाय चेपू लागले. तिथे असलेले सगळेच जण या दृश्याकडे चकित नजरेने बघत राहिले.
या गोष्टीची स्वप्नातही कल्पना करू शकणार नाही असा भाव सगळ्यांच्या चेहऱ्यावर होता.
असे होते माणूसपण जपणारे वपु !
वपुं विषयी म्हटलं जातं की त्यांना स्वर ज्ञान उपजतच होतं.ते वादक गायक होऊ शकले असते पण ते झाले आर्किटेक्ट.
सायन हॉस्पिटल भाभा हॉस्पिटलची इमारत बिर्ला क्रीडा केंद्र दीनानाथ नाट्यमंदिर अशा वास्तू त्यांनी उभ्या केल्या. इमारती बांधता बांधता माणूस आणि त्याचा अंतरंग जाणलं.
ते वाचकांपर्यंत अत्यंत तळमळीने पोहोचवण्याचा प्रयत्न केला. वपुंची कन्या स्वाती चांदोरकर म्हणतात "बापूंमुळे म्हणजेच वपुंमुळे आम्ही श्रीमंत झालो, ही श्रीमंती पैशांची नव्हती, ही श्रीमंती होती माणसांची....पैशांची श्रीमंती काही काळापूर्ती..माणसांनी दिलेल्या प्रेमाची आपलेपणाची श्रीमंती जन्मभरासाठी असते... "
वपु आठ दहा वर्षाचे होते तेव्हापासून हार्मोनियम वाजवायचे. कोणीही न शिकवता ते वादन करायचे. कालांतराने व्हायोलीनचे शास्त्रोक्त शिक्षण थोडे थोडे चालू झाले त्याचवेळी ते चित्रकलाही करू लागले. १९४८ साली त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरलं. त्या प्रदर्शनात त्यांचं एक चित्र चाळीस रुपयाला विकलं गेलं, त्या पैशातून त्यांनी आईसाठी साडी, बहिणीसाठी दोन स्टीलच्या वाट्या, आणि वडिलांसाठी रुमाल विकत घेतला. वयाच्या सोळाव्या वर्षी ती त्यांची पहिली कमाई होती.
पुढे त्यांच्या कर्मचारी या पुस्तकाला राज्य सरकारचे पारितोषिक मिळालं त्या २५ हजारात त्यांनी पत्नीसाठी पहिला सोन्याचा दागिना घेतला.
वपुंची ही दानत फक्त स्वतःच्या कुटुंबपूर्ती मर्यादित नव्हती. कार्यक्रमाच्या मिळकतीतून ते काही वाटा बाजूला ठेवत,जेव्हा ते पुरेसे झाले असे त्यांना वाटले त्यावेळेला त्यांनी केलेला संकल्प पुरा झाला म्हणून त्यांनी रोख एक लाख रुपये कॅन्सर सोसायटीला दिले. कुठलाही गाजावाजा न करता त्याची बातमी होऊ दिली नाही.
१९८९ मध्ये त्यांना फाय फाउंडेशनचे पुरस्कारातून ३५ हजार रुपये मिळाले. मानचिन्ह मानपत्र ही मिळाले. ते सगळे पैसे त्यांनी घरी स्वयंपाकाला येणारी आणि पत्नीच्या आजारपणात तिची काळजी घेणाऱ्या मुलीला शारदेला दिले. ती गरीब होती तिला राहायला घर नव्हते. त्या घरासाठी त्यांनी हे पैसे तिला दिले.
नागपूरला वपुंच्या कथाकथनाचा कार्यक्रम होता. पहिल्याच रांगेत एक अपंग मुलगा बसलेला होता. त्यावेळी त्यांना काय वाटले कोण जाणे, पण त्यांनी त्या मुलाला व्हीलचेअर साठी त्या कार्यक्रमाचं संपूर्ण मानधन देऊन टाकलं व याची कुठेही वाच्यता केली नाही. त्या कार्यक्रमाला हजर असलेल्यांनी ही गोष्ट त्यांच्या मुलीला सांगितली किंवा तर जेव्हा वपु हयात नव्हते तेव्हा.
( संकलीत)