आधुनिक मराठी साहित्यातील आद्यलेखिका. आधुनिक मराठी साहित्यातील कादंबरी ,चरित्र आणि कथा या साहित्याप्रकारचे महिला म्हणून प्रथमता लेखन केले आहे. त्याकाळात स्त्रीशिक्षणाला विरोध होत असे. पण वडिलांच्या प्रोत्साहनामुळे या अशा पद्धतीने शिकल्या. पुढे स्वप्रयत्नाने मराठी, इंग्रजी, संस्कृत नाटके वाचून त्यांनी आपली आवड जोपासली.त्यांनी मराठीतील प्राथमिक शास्त्रीय पुस्तके वाचली. तसेच मंडलिकांचा इतिहास, अर्थशास्त्र, कादंबरीसह भारतसार व पेशवे, होळकर, पटवर्धन, शिवाजी महाराज इ. बखरीही त्यांनी वाचल्या. याशिवाय कुमारसंभव, किरातार्जुनीय, मेघदूत या संस्कृत नाटकातील बरेचसे श्लोक त्यांनी तोंडपाठ केले होते.इंग्रजीही त्या शिकत होत्या.
गोविंदराव कानिटकर आणि काशीबाईंनी मिळून मनोरंजन आणि निबंधचंद्रिका नावाचे नियतकालिक सुरू केले. रंगराव (१९०३) व पालखीचा गोंडा (१९२८) या कादंबऱ्या आणि शेवट तर गोड झाला (१९८९), चांदण्यातील गप्पा (१९२१), शिळोप्याच्या गोष्टी (१९२३) हे कथासंग्रह त्यांचे प्रकाशित झाले आहेत. डॉ.आनंदीबाई जोशी :चरित्र व पत्रे या चरित्रात्मक पुस्तकाने साहित्यात त्यांना बरीच ख्याती मिळाली. हरीभाऊंची पत्रे हे त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे.डॉ. आनंदीबाईंच्या चरित्र लेखनाला हात घालण्याची आपली कुवत नाही, असे प्रामाणिकपणे म्हणतच, इंग्रजी शिकत, आनंदीबाईसंबंधी देशभगिनीने लिहिणे कर्तव्य आहे या भावनेने त्यांनी डॉ. आनंदीबाई जोशींचे चरित्र लिहिले . यादृष्टीने त्या मराठीतील आद्यचरित्र लेखिका ठरतात.काशीबाईंचे लेखन हे अनुभवावर आधारित असल्याने प्रत्ययकारी आहे. वर्णने लांबलचक, तपशीलवार असतात. पण त्यातही त्यांची सूक्ष्म निरीक्षण शक्तीच प्रत्ययाला येते.१९०६ मध्ये पुणे येथील ग्रंथकार संमेलनाचे गोविंदराव कानिटकर अध्यक्ष होते. त्या संमेलनाला त्या एकट्या स्त्री लेखिका उपस्थित होत्या. १९०९ मध्ये वसंत व्याख्यानमालेत काशीबाई अध्यक्ष होत्या. त्या पहिल्या स्त्री अध्यक्षा ठरल्या. ( संदर्भ - मराठी विश्वकोश)