( ८ एप्रिल १९२८ - ६ मार्च १९९२ ( कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात शिकत असतांना कथा लिहिल्या त्या वेगवेगळ्या मासिकात प्रसिद्ध झाल्या. ‘बारी’ (१९५९), ‘माझा गाव’ (१९६०) ह्या त्यांच्या सुरुवातीच्या कादंबर्यांत ग्रामीण जीवनाचे चित्रण केले आहे... माधवराव पेशवे व त्यांची पत्नी रमाबाई यांच्या सहजीवनावरील ‘स्वामी’ ही कादंबरी लिहिली आणि ही मराठीतील बहुचर्चित आणि वाचकप्रिय ऐतिहासिक कादंबरी ठरली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील श्रीमानयोगी ने तर इतिहास घडवला.
कर्णाच्या जीवनाचा शोध घेणारी ‘राधेय’ ही देसाई यांची एकमेव पौराणिक कादंबरी आहे. ‘समिधा’ , ‘लक्ष्यवेध’ , ‘पावनखिंड’, ‘राजा रविवर्मा’, ‘अभोगी’ , ‘प्रतीक्षा’ , ‘शेकरा’ या कादंबर्यांनाही वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ‘रंगल्या रात्री अशा’ , ‘संगोळी राय्याण्णा’ (कन्नड), ‘सवाल माझा ऐका’ व ‘नागीण’ या चित्रपटकथा लिहिल्या आहेत; त्यांचे सोळा कथासंग्रह, अनेक नाटके प्रकाशित झालेले आहेत. तीन तपे अविरतपणे विविधांगी लेखन करणार्या देसाई यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.इचलकरंजी येथील साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाचा बहुमान देसाईंना मिळाला.कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य, दिल्ली येथील साहित्य अकादमीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले.१९६४ साली ‘स्वामी’ला साहित्य अकादमीचाही पुरस्कार मिळाला. १९७३ साली भारत सरकारतर्फे त्यांना ‘पद्मश्री’ प्रदान करण्यात आली. महाराष्ट्र शासनातर्फे १९९० साली देसाईंना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ( संदर्भ - महाराष्ट्र नायक)