बाळाजी प्रभाकर मोडक

बाळाजी प्रभाकर  मोडक 





( २२ मार्च १८४७ – २ डिसेंबर १९०६ )

 मोडकांनी इतिहास, भूगोल, विज्ञान, बँकिंग इत्यादी विषयांवर सुमारे ४३ (३८ प्रकाशित व ५ अप्रकाशित) मराठी पुस्तके लिहिली व भाषांतरीत केली.भावी काळात विज्ञान शिक्षण मराठीतून सुरू झाल्यास, पाठयपुस्तके उपलब्ध असावीत, म्हणून मोडकांनी विज्ञानावर २६ पुस्तके मराठीत लिहिली. 


यंत्रशास्त्र, निरिंद्रीय व सेंद्रीय रसायनशास्त्र, शेतकी, प्राणीशास्त्र, खनिज, वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ, आरोग्यशास्त्र, उष्णता, विद्युत, चुंबकत्त्व, ध्वनी व प्रकाश इत्यादी विज्ञानशाखांमधील अत्याधुनिक संशोधन मराठीत आणणारे  पहिलेच लेखक होत. त्यांच्या वैज्ञानिक पुस्तकांतील परिशिष्टात, स्वतः नव्याने तयार केलेली  परिभाषा, इंग्रजी प्रतिशब्दासह देत, तिचा समावेश नंतरच्या विज्ञान वाङमयात व हल्लीच्या मराठी विज्ञान पाठ्यपुस्तकात झालेला आढळतो.भारतीय संस्थानिक, सरकार व खाजगी संस्थांनी विज्ञान प्रसार, शिक्षण व संशोधनाच्या चळवळीस आर्थिक सहा़य्य करावे अशी शिफारस मोडकांनी केली. विज्ञान बुद्धीप्रामाण्यावर व प्रत्यक्ष अनुभवावर आधारलेले असल्यामुळे, शिक्षणात विज्ञानाचे स्थान उंचावल्यास, भारतीयांच्या अंधश्रद्धा नष्ट होतील असे मोडकांना वाटे. 

( संदर्भ - मराठी विश्वकोश)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.