संजीवनी मराठे

संजीवनी रामचंद्र मराठे



( १४ फेब्रुवारी १९१६ – १ एप्रिल २०००). 


विशेषकरून गीतरचना व सुस्वर काव्यगायन यांसाठी मान्यता पावलेल्या एक आधुनिक मराठी कवयित्री. शाळकरी वयातच त्यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. 
या रचनांचा काव्य – संजीवनी ( १९३२ ) हा त्यांचा पहिला संग्रह असला, तरी संजीवनींची रसिकांना खरी ओळख झाली ती राका ( १९३८ ) ह्या संग्रहातून ( काव्य – संजीवनीतील निवडक रचनाही त्यात पुनर्मुद्त केलेली आहे ).त्यानंतरची संजीवनींची कविता संसार ( १९४३ ), छाया ( १९४९ ), चित्रा ( १९५७ ) व चंद्रफूल ( १९५१ ) या कवितासंग्रहांतून प्रकाशित झाली आहे. भावपुष्प ( १९५१ ) व परिमला ( १९५९ ) हे त्यांचे गीतसंग्रह. संजीवनी ( १९७६ ) हा त्यांच्या निवडक कवितेचा संपादित संग्रह. तसेच काही बालगीतसंग्रह व लाडकी लेक ( १९७६ ) ही अनुवादित बालकादंबरिका ह्यांचाही त्यांच्या साहित्यसेवेत समावेश होते.प्रणयानुभवातील तरल स्पंदने, त्याची स्वप्‍निलता, अलौकिकता व्यक्त करणारी त्यांची कविता तिच्या अस्सलपणामुळे व वेगळेपणामुळे विशेष मनोवेधक ठरली.



 ‘शांत सागरी कशास उठविलीस वादळे’ हे गीत याचे उत्कृष्ट प्रातिनिधिक उदाहरण होय.महाराष्ट्र शासनाने बरं का ग आई ( १९६२ ) व हसू बाई हसू ( ९१६३ ) या त्यांच्या संग्रहांना प्रथम पुरस्कार देऊन त्यांचा उचित गौरव केला आहे. 


( संदर्भ - मराठी विश्वकोश)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.