बंकिमचंद्र चट्टोपाध्याय

बकिंमचंद्र चट्टोपाध्याय


( २७ जुन १८३८ - ८ एप्रिल १८९४ ) 

भारतीय कादंबरीलेखनाचा पाया घालणारे पहिले कादंबरीकार, कवी, संपादक, तत्त्वज्ञ . आधुनिक भारतीय साहित्यामध्ये कादंबरीलेखनाची पायाभरणी बंकिमचंद्रांनी केली असे मानले जाते. कादंबरी हा वाङ्मयप्रकार त्यांनी वाचकांमध्ये रुजवला आणि लोकप्रियही केला. बंकिमचंद्र, मायकेल मधुसूदन दत्त आणि शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांनी बंगाली वाङ्मयसृष्टी समृद्ध केली.





त्यांच्या सुरुवातीच्या काही कादंबऱ्या सामाजिक आणि कौटुंबिक विषयांवरच्या होत्या. पण पुढे मात्र ‘चंद्रशेखर’, ‘राजसिंह’, ‘आनंदमठ’ अशा ऐतिहासिक पाश्र्वभूमीवरील कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. १८८२ मध्ये पुस्तकरूपानं प्रकाशित झालेल्या ‘आनंदमठ’ या कादंबरीने भारतीय स्वातंत्र्यलढय़ाच्या  इतिहासाला पुढच्या काळात एक वेगळे वळण दिले. ‘आनंदमठ’ ही कादंबरी आशयदृष्टय़ा जेवढी होत्या समृद्ध आहे, तेवढीच वादग्रस्तताही या कादंबरीने आतापर्यंतही निर्माण केली आहे. ‘आनंदमठ’ आणि ‘वंदे मातरम्’ ही एकत्रित बांधली गेलेली एक अजोड कलाकृती आहे. १८७५ मध्ये लिहिले गेलेले ‘वंदे मातरम्’ हे गीत त्यांनी या कादंबरीत अत्यंत चपखलपणे बसवले होते. या गीताने पुढे इतिहास घडवला.


( संकलीत)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.