(२२ एप्रिल १९२९ – २० सप्टेंबर २०१४).
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषावैज्ञानिक. भाषाविज्ञानाबरोबरच आस्वाद, समीक्षा आणि मीमांसा या तिन्ही दृष्टीने साहित्याचा सखोल विचार त्यांनी त्यांच्या लेखन – संशोधनातून केला आहे. मराठी व्याकरणाची नवी दिशा’ हा त्यांचा मराठीतील पहिला लेख सत्यकथा मासिकात छापून आला (१९६५). मराठी भाषेत त्यांची पुढील पुस्तके प्रसिद्ध आहेत: मराठी भाषेचा आर्थिक संसार (१९७८), प्राचीन भारतीय साहित्य मीमांसा (१९७९),भेदविलोपन: एक आकलन (१९९५), वैखरी : भाषा आणि भाषाव्यवहार (१९९६) आणि रुजुवात.
त्यांचा पीएच्.डी. साठी लिहिलेला मराठी भाषेसंबंधीचा ‘लँग्वेज इन सिमॅओटिक पर्स्पेक्टिव्ह: द आर्किटेक्चर ऑफ अ मराठी सेन्टेन्स’ हा प्रबंध इंग्रजीत प्रकाशित झाला आहे.
त्यांच्या प्राचीन भारतीय साहित्य मीमांसा या ग्रंथाचे हिंदी व गुजराती अनुवादही प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या भाषाविज्ञान व साहित्य अनुवाद, कलासमीक्षा, तत्त्वज्ञान अशा क्षेत्रांमधील मौलिक कामगिरीबद्दल भारत सरकारने २००२ मध्ये पद्मश्री हा किताब बहाल करून त्यांचा गौरव केला. त्यांच्या रुजुवात या ग्रंथालाही २०१० या वर्षीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.
( संदर्भ - मराठी विश्वकोश)