वि. वि. बोकील

वि. वि. बोकील 




( ७ जुन १९०३ - २२ एप्रिल १९७३ ) 

हे  लेखक, पटकथा लेखक, नाटककार, आणि शिक्षणतज्ञ होते.  १९४१-४२ च्या सुमारास ‘मंगळागौरीच्या रात्री’ ही बोकीलांची कथा मा. विनायकांच्या वाचनात आली आणि त्यांनी बोकीलांना तत्काळ बोलावून त्या कथेचे संवादलेखन करून घेतले. चित्रपटाला नाव दिले पहिली मंगळागौर. 




कुबेर की रंक, तू तिथे मी , ठिगळ, द्वंद या बोकिलांच्या काही कादंबऱ्या. तारांबळ,लगीन घाई, माहेरघर, गुडघ्याला बाशिंग ही काही नाटके लिहिली. चिमुकला संसार गळ्याची शपथ वाट चुकलेले नवरे याला जीवन ऐसे नाव  हे त्यांचे गाजलेले चित्रपट.


 ‘गाठीभेटी’ या बोकील यांच्या अत्यंत गाजलेल्या कादंबरीवरून दत्ता धर्माधिकारींनी ‘बाळा जो जो रे’ (१९५१) हा अत्यंत यशस्वी बोलपट बनवला. तसेच ‘बेबी’ ही त्यांची बहुचर्चित कादंबरीवरही चित्रपट निघाला.सुमारास मराठी चित्रपटसृष्टीत तमाशापटांना बहार आला आणि मध्यमवर्गीय सामाजिक कथेवरचे चित्रपट मागे पडले. अशा परिस्थितीतही त्यांनी ‘यात्रा’, ‘जीवन ऐसे नाव’, ‘सप्तपदी’, ‘वाट चुकलेले नवरे’ हे चित्रपट लिहिले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.