सर ऑर्थर कॉनन डाॅयल

सर आर्थर इग्नेशियस कॉनन डॉयल 




( २२ मे १८५९; -  ७ जुलै १९३०) हे स्कॉटिश लेखक होता. त्यांनी इंग्रजी भाषेत रहस्यकथा, विज्ञानकथा, कादंबऱ्या व कविता लिहिल्या. त्याने लिहिलेल्या शेरलॉक होम्स या काल्पनिक सत्यान्वेषी पात्राच्या रहस्यकथा लोकप्रिय असून गुन्हेगारीविषयक इंग्लिश साहित्यातील मानदंड मानल्या जातात. 



सुरुवातीला त्यांनी प्रेमकथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, कवीताही केल्या. काही नाटकंही लिहिली. त्यांनी शेरलॉक होम्स च्या रहस्यकथा लिहायला सुरुवात केली आणि  बघता बघता इतकी लोकप्रियता मिळाली की, लंडनमधले लोक बेकर स्ट्रीट वरचं डॉ वाॅटसनचं घर शोधायला येऊ लागले. 



एका कथेत शेरलॉक होम्स ची अवतार समाप्ती केला,परंतु वाचकांच्या आग्रही प्रेमापोटी पुन्हा अवतरावे लागले. अशी लोकप्रियता गुप्तहेराला क्वचितच मिळाली असेल. जगातील अनेक भाषांमध्ये शेरलॉक होम्स किचकट गुन्हे शोधतोयबोलतोय.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.