( १० जुन १९०४ - ४ मार्च १९८५ )
१९३१ मध्ये सहस्रबुद्धे यांनी ‘किर्लोस्कर’ मासिकातून कथालेखनाला आरंभ केला. १९३४ मध्ये त्यांच्या ‘लपलेले खडक’ या लघुकथासंग्रहाचे प्रकाशन झाले. कथांतून ‘कुणबी’सारख्या बोलीभाषेतून संवाद साधणार्या या कथांत जिवंतपणा असला, तरी त्यांचे वळण बोधवादी होते. येथे केतकर, वा.म.जोशी, सावरकर यांच्या ललित लेखनाशी जवळीक जाणवत होती.
१९३३ मध्ये त्यांचे पहिले नाटक ‘सत्याचे वाली’ हे प्रसिद्ध झाले आणि दुसरे नाटक ‘वधू संशोधन’ १९३७ मध्ये प्रसिद्ध झाले. १९४३मध्ये त्यांचे मित्र दत्तप्रसन्न काटदरे यांनी ‘वसंत’ मासिक सुरू केले. १९४३च्या ‘वसंत’ दिवाळी अंकात त्यांनी ‘राष्ट्रीय अहंकार’ या विषयावर लिहिले. त्यातूनच ‘अहंकार’विषयक लेखमाला तयार झाली. तेव्हापासून १९७९पर्यंत ते सातत्याने ‘वसंत’साठी लिहिते राहिले.
ग्रंथांना गुरू मानणारे डॉक्टर ग्रंथरचनेची तुलना राष्ट्ररचनेशी करत. ग्रंथ नष्ट करणारा परमेश्वराची मूर्ती अशी बुद्धी नष्ट करतो, असे ते मानत व ग्रंथरचना करणार्याला परमेश्वराची मूर्ती व्यक्तीच्या चित्रात स्थापन करणारा मानत.
( संदर्भ - महाराष्ट्र नायक)