( ९ जानेवारी १९१८ - १० जुलै १९८९ ) .
‘प्रतिभा’ आणि ‘किर्लोस्कर’ यांमधून लेखनास त्यांनी सुरुवात झाली. १९४२ मध्ये ‘किर्लोस्कर’मधून ‘आम्ही हिंदू आहोत का?’ हा पहिला लेख लिहिला. ‘प्राध्यापकांनो, शिक्षक व्हा’ हा लेख त्या काळी गाजला होता. मार्क्सवादी विचारवंत, चांगल्यापैकी समीक्षक, पत्रकार, रशियन साहित्याचे अनुवादक अशीही त्यांची ओळख होती.
अनेकविध चिनी व रशियन पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले. माओ, स्टालिन, पुश्कीन, गॉर्की यांच्या ग्रंथांचे तसेच रशियन आणि युक्रेनियन लोककथांचे अनुवाद त्यांनी केले.हरवलेले दिवस या आत्मचरित्रात मुंबई येथे कम्युनमध्ये राहताना तेथे आलेले अनुभव, कम्युनिस्टांची कार्यप्रणाली, त्यांची मुखपत्रे, त्यातील लेखनप्रक्रिया, स्वतःचा झालेला कोंडमारा, मानसिक त्रास, स्वतःचा भ्रमनिरास इत्यादी गोष्टींचे इत्थंभूत वर्णन व प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टींचे सविस्तर चित्रण केलेले आहे. मराठीतील एक वाचनीय असे ते आत्मचरित्र आहे. याला १९८९ चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.
( संकलीत)