(१२ जुन १९१७ - २१ जुन २०१२ )
इ.स. १९४१ ते इ.स. १९८४ या काळात विपुल आणि दर्जेदार कादंबऱ्यांचे लेखन केले. मनोहर माळगावकरांच्या कादंबऱ्यांचे 'अधांतरी', द प्रिन्सेस हे अनुवाद. शेक्सपियरच्या 'हॅम्लेट', किंग लियर, विंटर्स टेल' इत्यादी नाटकांचे अनुवाद गाजले.
कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, निबंध, चरित्र, चरित्रात्मक कादंबरी, कुमार वाङमय, संतचरित्रे अशा विविध वाङ्मयप्रकारात खेर यांनी बहुमोल योगदान दिले. पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असताना सर्जनशील साहित्यिक म्हणून नावलौकिक मिळविणारे खेर ‘केसरी’चे सहसंपादक आणि ‘सह्याद्री’चे संपादक होते.
१९३९मध्ये वकिलीची पदवी मिळवतानाच त्यांचा ‘नादलहरी’ हा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला. १९६८ पर्यंत त्यांच्या जवळपास पन्नास सामाजिक, कौटुंबिक कादंबऱ्या, चरित्रे आणि इतर पुस्तके प्रकाशित झाली.‘यज्ञ’ ही त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरील लिहिलेल्या पहिल्या चरित्रात्मक कादंबरीची प्रकाशनापूर्वीच ११ हजार प्रतींची नोंदणी झाली होती. त्यांच्या गाजलेल्या साहित्यकृतींचे गारूड आजही रसिक वाचकांच्या मनावर कायम आहे. लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावरील ‘अमृतपुत्र’ ही कादंबरी लिहिण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना ताश्कंदला आणि ‘हिरोशिमा’ ही कादंबरी लिहिण्यासाठी जपानला राज्य अतिथी (स्टेट गेस्ट) म्हणून पाठविले होते.. त्यांची ११७ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांची एकूण पृष्ठसंख्या २५०००हून अधिक आहे. ’समग्र लोकमान्य टिळक’ या सप्तखंडी ग्रंथाचे भा.द.खेर एक सहसंपादक होते.
( संकलीत)