पी. सावळाराम

पी. सावळाराम 




( ४ जुलै १९१३ - २२ डिसेंबर १९९७) हे एक मराठी भावकवी होते.  मूळ नाव निवृत्तीनाथ रावजी पाटील.
भावगीते मराठीत रुजवण्यात ग. दि. माडगूळकर, शांता शेळके यांच्यासह सावळाराम यांचेही नाव घेतले जाते. मराठी गीतांना सुवर्णकाळ आणण्यात त्यांचाही मोठा वाटा होता.


सावळाराम यांचे 'गंगा जमुना डोळ्यात उभ्या का' हे गाणे विशेष गाजले. इतक्या वर्षांनंतरही हे गाणे प्रत्येक विवाह सोहळ्याचा अविभाज्य भाग आहे. हे गाणे सावळाराम यांनी पुणे स्टेशनवर एका नवविवाहित मुलीला सासरी जाताना निरोप देण्याऱ्या आईच्या तोंडचे ’दिल्याघरी तू सुखी रहा’ हे वाक्य ऐकून लिहिले होते. 



पी. सावळाराम यांच्या कवितांच्या साध्या सोप्या रचनांमुळे कुसुमाग्रजांनी त्यांना 'जनकवी' ही उपाधी बहाल केली होती. गोड गोजीरी लाज लाजीरी, गंध फुलांचा गेला सांगुन, मानसीचा चित्रकार तो, जिथे सागरा धरणी मिळते अशी जवळपास आठशे गाणी लिहिली. भावगीते लिहून मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे पी. सावळाराम हे पहिले चित्रपट गीतकार होत. म्हणूनच लोकांनी त्यांना ‘जनकवी’ ही उपाधी प्रेमाने बहाल केली.   आकाशवाणी च्या कामगार सभेसाठी संहिता लेखन केले, सारे प्रवासी घडीचे, कन्यादान, सलामी या चित्रपटाच्या कथा लिहिल्या. 

( संकलीत)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.