( ५ जुलै १९२० - ४ एप्रिल १९९६ )मूळ नाव आत्माराम नीलकंठ साधले, हे मराठीतील एक विद्वान लेखक होते. हा जय नावाचा इतिहास या युधिष्ठीराला महाभारताचा खलनायक ठरविणाऱ्या कादंबरीमुळे आनंद साधले यांना सुरुवातीची खूप कुप्रसिद्धी व नंतर अमाप प्रसिद्धी मिळाली.
या कादंबरीचे क्रमश: प्रकाशन करणे मराठीतील अनेक मासिकांनी नाकारले शेवटी दिपावली ने त्यांच्या अंकात प्रसिद्ध करायला सुरुवात केली. महाभारताच्या अनेक अभ्यासकांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली. सामान्य वाचकांनी मात्र डोक्यावर घेतली कादंबरी जसजशी पुढे सरकत गेली तसतसे त्याचे विरोधक थंडावले. दमयंती सरपटवार या टोपण नावाने काहीसे वात्रट वाटणारे लेखनही केले आहे आनंदध्वजाच्या कथा, इसापनीती भाग एक व दोन (बालसाहित्य) लिहिले.आकराव्या शतकात रचलेल्या रुक्मिणी स्वयंवर या काव्याचा रसाळ भावानुवाद केला.