( ३ जुलै १९२५ - ७ नोव्हेंबर २००९ )
पुलंचे व्यक्तिमत्व भरात असताना सुनीताबाई फारशा प्रकाश झोतात नव्हत्या. खरंतर सुनीताबाईंनी पुलं बरोबर बरोबर अनेक नाटके व चित्रपटातही भूमिका केल्या होत्या. नंतर बोरकर, मर्ढेकर, आरती प्रभू यांच्या काव्याचा मागोवा घेणारे कार्यक्रम सुरू केले तेव्हा रसिकांना सुनीताबाईंची ओळख झाली.
१९९० मध्ये 'आहे मनोहर तरी' हे सहजीवनाचा मागोवा घेणारे चरित्रात्मक पुस्तक प्रसिद्ध झाले, आणि त्याने साहित्य वर्तुळात खळबळ उडवून दिली. लेखिका म्हणून त्यांचे हे पहिलेच पुस्तक चांगलेच गाजले. गुजराती व इंग्रजी भाषेत त्याचे भाषांतरही झाले. त्यानंतर 'मन्याची माळ', 'मनातले आकाश', ' सोयरे सकळ' या पुस्तकातून त्यांची साहित्यिक म्हणून ओळख प्रस्थापित झाली. जीए कुलकर्णी यांच्याशी त्यांचा जो पत्र व्यवहार झाला त्या पत्रव्यवहाराचा संग्रह पुस्तक रूपात प्रसिद्ध झाला' प्रिय जीए' या नावाने हे पुस्तक सुद्धा चांगलेच गाजले. त्यांना न. चि. केळकर पुरस्कार, महाराष्ट्र राज्य वाड्मय पुरस्कार, यासह अनेक पुरस्कार मिळाले.
( संकलीत)