सार्थ

पुस्तकाचे नाव - सार्थ 
लेखक - एस. एल. भैरप्पा
अनुवाद - उमा कुलकर्णी
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाउस 
आठव्या शतकातील सामाजिक, राजकीय, धार्मिक परिस्थितीची ओळख करून देणारं सत्य आणि कल्पीत घटनांच मिश्रण असणारं  उत्कंठावर्धक कथानक.

सार्थ म्हणजे देशोदेशी फिरणाऱ्या व्यापारांचा तांडा. यात सामान लादलेल्या गाड्या, घोडे, नोकर चाकर, संरक्षणासाठी हत्यारबंद सैनिक सुद्धा सोबत असायचे. यातील संख्या पंचवीस पन्नास पासून पाचशे पर्यंत असू शकायची. अशा सार्थाच्या आसऱ्याने विद्यार्थी,  तीर्थयात्री, नाटक कंपन्या अशी लोकंही प्रवास करायचे. 
अशाच एका सार्थासोबत नागभट्ट प्रवासाला निघाला होता.  धर्मशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी काशीला चाललाय असं तारावती राज्याच्या राजाने सार्थ प्रमुखाला सांगीतलं होते. वर पैसेही दिले होते. प्रत्यक्षात मात्र हे सार्थ व्यापार कशा पध्दतीने करतात, त्याचा तारावती राज्याला कसा उपयोग करुन घेता येईल याचा अभ्यास करायचा होता. बालपणीचा मित्र म्हणून राजाच्या आग्रहाखातर नागभट्ट प्रवासाला निघाला होता.

वास्तविक राजा आमरुकला नागभट्च्या पत्नीची अभिलाषा होती म्हणून त्याने नागभट्टला दुर पाठवले होते. पुढे वर्षभराने नागभट्टच्या गावातल्या एका माणसाने सांगितले की, त्याची पत्नी राजाच्या संपत्तीला भाळून व्यभिचारी झाली.गर्भार राहीली. हे सहन न झाल्यामुळे आईने हाय खाऊन प्राण सोडले होते.

मित्राने आणि पत्नीने केलेल्या विश्वासघाताने वैफल्यग्रस्त होऊन नागभट्टाने घरी परतण्याचा विचार सोडून दिला. मथुरेला दुसऱ्या सार्थ बरोबर तो काशीला जाणार होता.आणि तो सार्थ यायला काही दिवस लागणार होते म्हणून तो मथुरेत राहीला. इथुनच त्याला आयुष्याचे वेगवेगळे रंग अनुभवायला मिळाले. नाटकात भुमिका केल्या. नाटकातली नायिका चंद्रिकेच्या प्रेमात पडला. ध्यानमार्गाकडे वळाला, तरी मनाला शांती मिळाली नाही म्हणून  क्षुब्ध होऊन तंत्रविद्या शिकू लागला. त्यावेळी वैदिक नितीनियम भिरकावून दिले, खाऊ नये ते खाल्लं,चंद्रिकेने नकार दिल्यावर कशात तरी मन अडकलेलं असावं म्हणून शुन्याचा शोध घेण्यासाठी नालंदा विद्यापीठात शिक्षणासाठी गेला. 

त्याच्या या जगण्यातून, प्रवासातून त्यावेळच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीचा, चालीरीतीचांही परिचय होतो. विविध प्रांतांतील संस्कृती, कला, व्यापार आणि धार्मिक प्रथा दिसतात. यातून त्या काळातील भारताची एकता आणि वैविध्य यांचे दर्शन होते.

नालंदा विद्यापीठाची भव्यता, तिथल्या शिक्षण व्यवस्थेची ओळख होते. कुमरिल भट्ट, मंडन मिश्र, शंकराचार्य या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचा कार्यभाग, वैदिक धर्माचे समर्थन करतांना बौद्ध धर्माचा प्रतिवाद करता यावा म्हणून कुमरिल भट्ट नालंदा विद्यापीठात बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी नाव बदलून गेले होते.नंतर अपमानास्पद पध्दतीने तिथून परतले होते. या प्रसंगी नकळत गुरुंचा अपमान झाला म्हणून त्यांनी स्वतः:ला देहदंडाची शिक्षा दिली. 

शंकराचार्यांशी वादविवादात हारल्यावर मंडन मिश्रांनी सन्यास घेतला होता ‌विषेश म्हणजे या प्रसंगी परिक्षक मंडणमिश्रांची पत्नी भारतीदेवी परिक्षक होत्या. त्यांनीच शंकराचार्य विजयी झाल्याचा निवाडा दिला होता. या ऐतिहासिक सत्याभोवती गुंफलेल्या काल्पनिक कथा अत्यंत मनोवेधक पध्दतीने मा़डल्या आहेत. मध्ययुगातील अनेक 

वैदिक आणि बौद्ध धर्माचा प्रभाव. राजकीय, सामाजिक, धार्मिक भुमिका, मुस्लिम आक्रमण, हे सगळं कथानकाच्या ओघात येतं. यात नागभट्ट आणि चंद्रिकेचे बदलत जाणारे संबंध. नाटकातून केलेली जनजागृती याचीही उत्कृष्ट मांडणी आहे. शेवट अगदी अंतर्मुख करणारा आहे.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.