डोंगराएवढा

पुस्तकाचे नाव - डोंगराएवढा
लेखक - शिवराम कारंत 
अनुवाद - उमा कुलकर्णी 
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाउस 


मुंबईची लोकसंख्या बारा लाख, तसंच सोनं १५ रुपये तोळा‚ शंभर रुपये म्हणजे नऊ खंडी सुपारीचा भाव असलेल्या कालखंडातल्या काळात डोंगर दऱ्यांनी वेढलेल्या एका निसर्गरम्य गावांत घडणारी ही गोष्ट आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखकाची भावभावनांच्या  वेगवेगळ्या रंगछटा दाखवणारी उत्कंठावर्धक कलाकृती.

कामासाठी दिवसभर भटकल्यावर बारा मैलांवर असलेल्या पंज गावी जायचं होतं.पण रस्ता चुकल्यामुळे थकलेला शिवराम रात्र घालवण्यासाठी कोणाच्या ओसरीवर जागा मिळेल याची चौकशी करीत असताना तो ब्राह्मण म्हणून  त्याला केळबेल्लू गावातल्या गोपलय्यांकडे पोहचवलं. साठीचे गोपलय्या पत्नी शंकरीसह राहत होते.

भव्य देहयष्टी‚ डोक्यावरचे पिकलेले केस‚ अर्धवट पिकलेले दाढी-मिशांचे खुंट‚ कमरेला कसलेला पंचा‚ लव नसलेल्या अंगाला भरपूर तेल चोपडलेले. साठी गाठलेले  गावतलं आदरस्थान असलेले गोपलय्या सांजदेवतेप्रमाणे भासले. पन्नाशी पार केलेल्या त्यांच्या पत्नीसह कोणतीही ओळख नसुनही आलेल्या आगंतुक पाहुण्याचे मनापासून स्वागत केले. आग्रहाने जेऊ घातले. 

फक्त रात्रीसाठी आसरा शोधणारा शिवराम दूसऱ्या दिवशी या वृध्द दांपत्याच्या आग्रहामुळे जाऊ शकला नाही. त्यानंतरही  काही दिवस थांबला. या कालावधीत त्याला या वृद्ध दांपत्याची, त्यांच्या आसपास असणाऱ्या लोकांची सूख दु:खे जाणुन घेता आली. या छोट्याशा आडवाटेवरच्या गावात राहणाऱ्या या ब्राह्मण दांपत्याची मुलगी बाळंतपणात मरण पावली आहे आणि शिकलेला मुलगा मुंबई-पुण्यासारख्या शहरात ‘बेपत्ता’ झाला आहे. त्यानं आपल्या आई-वडिलांशी संपर्क ठेवलेला नाही‚ याचं अतिशय दुःख वाटतय. आपला मुलगा कधीही परत येणार नाही हे वास्तव स्वीकारून स्वतः:ला काही न काही कामात गुंतवून  घेतलंय. त्यांच्या पत्नीला शंकरीला मात्र मुलाचा विसर पडत नाही. तिच्यातलं आईपण तिला मुलाची वाट बघणं सोडत नाही. 

अशा परिस्थितीतही या दांपत्याने जीवनेच्छा गमावलेली नाही. ना नात्याचा-ना गोत्याचा असा एक मुलगा− नारायण− सांभाळला आहे. मुलागा सोडून गेल्याची खंत असली तरी प्रत्यक्षात आता नारायण‚ त्याची बायको यांना सांभाळतात‚ काळजी घेतात. त्याची मुलं यांची नातवंडं होऊन राहतात. नारायण आणि त्याच्या पत्नीच्या नजरेत या वृद्ध दांपत्याविषयी फक्त आदर नसून तर परमेश्वरी भक्तिभाव आहे.गोपलय्यांनी जंगलातली जमीन मोठ्या कष्टाने लागवडीखाली आणून नारायणला कसायला दिली आहे. भविष्यात कधी जर त्यांचा मुलगा परत आला तर त्याला त्यांच्या वाडवडिलांकडूनू वारसाहक्काने घर शेतीवाडी मिळाली असती. परंतू जी जमीन त्यांनी फुलवली होती ती मात्र ते नारायणलाच देणार होते.

कथेच्या ओघात तिथला निसर्गाचं वर्णन येतं तसच या गावी जनावरं पाळायची म्हणजे महाकठीण काम... पाणी प्यायला गेली की‚ मगर पकडते‚ चारा खायला रानात गेली की वाघ खातो.! कितीतरी वेळा वासरं लांडग्या-कोल्ह्यांच्या तोंडीही जातात. शिवाय कड्यावरून पाय घसरून दरीत कोसळून मरतात ती वेगळीच..प्रसंगी असच माणसांच्या  बाबतीतही हे घडतं. जंगली हत्तींचा कळप जर शेतात घुसला तर वर्षभर केलेली मेहनत मातीमोल होतांना बघण्याची हतबल अगतिकता डोळे ओलावते. आणि स्वतः:चे दु:ख बाजुला ठेवून या लोकांना जमेल तशी मदत करणारे . मुलगी बाळंतपणात गेलेली, तरुण मुलगा बेपत्ता झालेला, रक्तातल्या नात्यातलं जवळपास कोणीही नसतांना जगण्यातली सकारात्मकता न हरवलेले गोपलय्या डोगराएवढे वाटतात. 

तिथल्या काही दिवसांच्या मुक्कामात शिवरामला प्रत्यक्ष आईबापांपेक्षाही जास्त प्रेम, आपुलकी मिळते. गोपलय्यांचं  त्याला तेलाची मालीश करून कढत पाण्याने अंघोळ घालणं, त्याला जंगलातल्या गमती जमती सांगत फिरवणं, शंकरी तर 
त्याच्यात स्वतः: च्या मुलाला शोधत असते.
त्यांना सोडून जावसं वाटत नसलं तरी त्याला जावं तर लागणारच होतं.

त्यांच्या मुलाचा जुना फोटो बघून तो आपल्याला कधीतरी मुंबईत भेटला आहे असं वाटतं. तिथून निघताना मनोमन ठरवतो की त्यांच्या मुलांची विनवणी करून त्याला आई वडिलांकडे पाठवायचं. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.