पुलोनी जवळपास ४० पेक्षा जास्त पुस्तके लिहिली. त्यातील असा मी असामी,बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली, हसवणूक ही काही. वाऱ्यावरची वरात, तुज आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, फुलराणी ही काही नाटके, पूर्व रंग, अपूर्वाई, जावे त्याच्या वंशा ही त्यांनी केलेली युरोप अमेरिका देशाची प्रवास वर्णने आहेत. त्यांनी कथाकथनाचे कर्यक्रम केले. त्याच्या ऑडिओ कॅसेट त्यावेळी प्रत्येक मराठी माणसाकडे हमखास सापडणारच.नारायण, रावसाहेब, अंतू बर्वा अशी व्यक्तिचित्रे आजही ऐकली जातात.
पुलंनी मराठी माणसाला काय दिले? तर त्याच्या रोजच्या जगण्यातील गमतीदार निरिक्षणे नेमकेपणाने पकडून त्याला हसायला शिकवले. होय पुलंवर महाराष्ट्राचं कालही प्रेम होतं आणि आजही आहे आणि उद्याही राहिल. याचं कारण त्यांची खुमासदार शैली. या महान लेखकामुळे आज महाराष्ट्राच्या साहित्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. भाषेवरील त्यांचे विशेष प्रभुत्व होत. त्यांची अनेक नाटकं प्रसिद्ध होती,मार्मिक, सूक्ष्म, चोखंदळ आणि प्रसन्न विनोद हे सामान्यतः त्यांच्या साऱ्याच लेखनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. त्यांच्या वक्तृत्वातही हे गुण आढळून येतात. अधिक तरल, अभिरुचिसंपन्न, कलात्मक व आधुनिक बनविली. उपहास-उपरोध, विसंगती, वक्रोक्ती श्लेष आदींचा उपयोग ते सारख्याच कौशल्याने करीत असले, तरी त्यांच्या विनोदात मर्मघातक डंख नसतो कारण मानवी जीवनातील . त्रुटींप्रमाणेच त्यातील कारुण्याची ह्या विनोदाला जाण आहे हास्याच्या कल्लोळात तो अश्रूंनाही हळुवार स्पर्श करतो. हासू-आसूंच्या ह्या हृदयंगम रसायनाने त्यांच्या विनोदाला श्रेष्ठ दर्जा प्राप्त करून दिला आहे. ज्यांच्या उल्लेखा शिवाय महाराष्ट्राचा व साहित्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही असे हरहुन्नरी कलंदर व्यक्तिमत्व म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे.
साहित्य अकादमी पुरस्कार (१९६५), पद्मश्री (१९६६), पद्मभूषण (१९९०) महाराष्ट्र भूषण पुरस्कार (१९९६) याशिवायही अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. (संकलीत).