यशवंत नरसिंहराव केळकर


य. न. केळकर ( १९ जुलै १९०२ - १४ फेब्रुवारी १९९४ )  ग्रंथवाङ्मय व इतिहास या दोन्हींच्या भोक्त्यांस अनेक दृष्टींनी अपूर्व वाटेल अशा ‘ऐतिहासिक पोवाडे’ (मराठ्यांचा काव्यमय इतिहास) या ग्रंथाचे कर्ते य. न. केळकर हे शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक म्हणूनही नावाजले गेले आहेत. मूळ मोडी लिपीतल्या पोवाड्यांचे मराठी बाळबोधीत लिप्यंतर करण्याच्या कामी त्यांनी घेतलेले परिश्रम व दाखवलेली सूक्ष्मता, काटेकोरपणा यापूर्वीच्या कोणाही पोवाडे संग्राहकाकडून दाखवले गेलेले नाही. ‘ऐतिहासिक पोवाडे’चे आणखी दोन खंड पुढे प्रसिद्ध झाले (१९४४ व १९६९). या ग्रंथाच्या पुरस्कारात महामहोपाध्याय द.वा.पोतदार म्हणतात, ‘ऐतिहासिक पोवाडे निवडून त्यांच्या पाठांची मोठ्या परिश्रमाने आणि कौशल्याने चिकित्सा करून अर्थबोधक व अवांतर टीपा जोडून वगैरे अनेक रीतींनी ग्रंथ होईल तेवढा उपयुक्त करण्याचा प्रयत्न केळकर यांनी मोठ्या कसोशीने केला आहे.’ विस्तृत प्रस्तावना हे या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य होय. ऐतिहासिक दफ्तरे अभ्यासून अभ्यासकांना व इतिहासप्रेमींना अत्यंत उपयोगी असा ‘ऐतिहासिक शब्दकोश’ ही (१९६२) साकार झाला. या कोशात पंधरा हजार ऐतिहासिक शब्दांचा समावेश आहे व ही एकट्या केळकरांची कामगिरी आहे. ‘विनोदलहरी’ (१९३२) हा विनोदी लेखांचा संग्रह आहे. ‘अंधारातील लावण्या’ (१९५९) हा लावणीसंग्रह, ‘मराठी शाहीर व शाहिरी वाङ्मय’ (१९७४) हा विवेचक ग्रंथ आहे.. .:
ऐतिहासिक दफ्तरे अभ्यासून अभ्यासकांना व इतिहासप्रेमींना अत्यंत उपयोगी असा ‘ऐतिहासिक शब्दकोश’ ही (१९६२) साकार झाला. या कोशात पंधरा हजार ऐतिहासिक शब्दांचा समावेश आहे व ही एकट्या केळकरांची कामगिरी आहे.
संपादित ग्रंथांमध्ये ‘होळकरांची कैफियत’ (१९५४), ‘केळकर कुलवृन्तात’ (१९५२), ‘केळकरांचा खासगी पत्रव्यवहार’ (१०५०) यांचा समावेश आहे. ( संदर्भ - महाराष्ट्र नायक)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.