मृत्यू जगलेला माणूस

मृत्यू जगलेला माणूस - रेखा बैजल

जीवन जगणं म्हणजे काय ? आपल्या माणसांवर, परिसरावर, विश्वावर भरभरून प्रेम करणे.खरे पणाने राहणे. आत्मग्लानी येईल असं कृत्य न करणं. स्वतःच्या मनातल्या न्यायालयात आपली मान उंचावली गेली पाहिजे. नाहीतर मनावर अपरिमित बोजा घेऊन जगण्याचा थकवा येऊ शकतो आपले अपराध, मनाच्या टोचण्या, आपला स्वभाव आपल्याला मृत्यूच्या प्रदेशात विनाकारण ढकलु पाहतात निदान मरताना तरी जगतानाच ओझं बाजूला टाकून द्यायला हवं. . 
हे सगळं म्हणजे मृत्यू जगलेला माणूस जो स्वतःचा अहगंड मारून टाकतो आणि मुक्तात्मा  होऊन उरलेलं आयुष्य जगतो. 
आप्पांसारखी एक व्यक्ती जी तुसडेपणाने जीवन जगली.कोणाच्याही मनाचा विचार केला नाही. मनाचे झरे आटतात अशा वेळी व्यक्तीला वैतागून अवेळी जीवन संपवावा वाटतं पण जेव्हा स्वतःच्या अपराधाचं प्रायश्चित्त  केलं जातं तेव्हा आजवर न फुटलेल्या झरे मनाला फुटतात आणि ७० व्या वर्षी आयुष्याच्या प्रेमात पडून जगावसं वाटतं. हे ओझं प्रत्येकाने टाकून दिलं तर जीवनात आनंद भरून राहील... हा विचार या कादंबरीच्या रूपाने वाचकांसमोर मांडला गेला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.