📚ॲनिमल फॉर्म - जॉर्ज ऑरवेल
अनुवाद - भारती पांडे
ही रुपकात्मक कादंबरी रशियातील तत्कालीन बोल्शेव्हिक क्रांतीची भ्रामक बाजू उघडतकीस आणण्यासाठी लिहिली होती.
ही नुसती कादंबरी नसून तत्कालीन सोवियत रशियाच्या वरकरणी साम्यवादी वाटणाऱ्या व्यवस्थेवर केलेला हल्ला होता.
ॲनिमल फॉर्म मधील नेपोलियन प्रमाणेच प्रत्येक राजव्यवस्थेमध्ये सत्तेवर येणारे नवीन सत्ताधारी त्यांना विरोध करणारे कसे राजद्रोही असुन अगोदरचे सत्ताधारी कसे चुकीचे आहेत हे नागरिकांना पटवून देतात. विरोध वाढू नये म्हणून त्यांचे प्रचारक सतत जनतेमध्ये आपल्या कामाचा खोटा आढावा देत राहतील आणि जनतेच्या अल्प स्मृतीचा चा फायदा घेऊन आत्ताची परिस्थिती ही आधीच्या परिस्थितीपेक्षा उत्तम आहे हे ठसवत राहतील याची खबरदारी घेतात.
जॉर्ज ऑरवेलनी ही कादंबरी १९४३ साली लिहिली होती.
अनेक अडीअडचणींना तोंड देऊन प्रकाशित आली १९४५ साली.
पाऊणशे वर्षातही या परिस्थितीत काही फरक पडला आहे असे वाटत नाही. जोपर्यंत जगातील राज्यव्यवस्थांमध्ये शक्ती व न्याय यांच्यामध्ये समतोल राखला जाणार नाही, जोपर्यंत सत्ताधारी आपल्या सत्तेचा अन्याय्य वापर करीत राहतील तोपर्यंत सामान्य माणसाला नीमुटपणे बघत राहण्याखेरीज गत्यंतर राहणार नाही.
पाऊणशे वर्षापुर्वीची कादंबरी आजही प्रासंगिक वाटते. भविष्यातही प्रासंगिक वाटत राहील. काही साहित्य कालातीत असते त्यापैकी एक कादंबरी एक आहे.