बा. भ. बोरकर

बाळकृष्ण भगवंत बोरकर : 
(३० नोव्हेंबर १९१० - ८ जुलै १९८४)


मराठीतील प्रसिद्ध कवी, कादंबरीकार आणि लघुनिबंधकार.

बोरकरांचे व्यक्तिमत्त्व व कवित्व संस्कारबहुल आहे. तसे ते परंपराप्रेमी पण त्यांच्या परंपराप्रेमावर झालेल्या सुभग व रसपूर्ण संस्कारांनी त्यांना ‘कवी’ बनविले. ग्रीकांच्या सौंदर्यदृष्टीचे मर्म पाश्चात्त्य साहित्याच्या अध्ययनाने आणि पौर्वात्य आत्मदर्शनाचे स्वरूप मराठी संतांच्या अभ्यासातून त्यांनी आत्मसात केले. बालकवी आणि विशेषतः तांबे यांच्या कवितेचा आदर्श त्यांच्यापुढे होता. निसर्गसौंदर्य व स्त्रीलावण्य यांच्यामधून बोरकरांना जीवनचैतन्याचा साक्षात्कार होतो. निसर्ग व प्रणय यांची त्यांच्या कवितेतील अनुभूती सर्जनशील व ऐंद्रिय असते. अलौकिकाच्या अंगाने निसर्ग-प्रेम-कला ह्यांतील लौकिक सौंदर्याचे आस्वादन करणे ही त्यांची प्रवृत्ती आहे. त्यांच्या शैलीची प्रकृती अलंकरणशील, गेय व संस्कृतनिष्ठ असून त्यांचे संगीतप्रेम त्यांच्या काव्यसंग्रहांच्या नावांतूनही प्रतीत होते. 

बोरकरांनी काव्यलेखनास आरंभ केला, तो काळ काव्यदृष्ट्या क्षीणबळ व परंपरासौंदर्याच्या अनुभूतीला आचवलेला होता. त्यामुळे त्यांची कविता अधिक पृथगात्म वाटली. त्या पृथगात्मतेच्या उसळत्या उल्हासातून निर्माण झालेल्या काही चिरतरुण, चिररुचिर कविता हीच त्यांची मराठी कवितेच्या क्षेत्रातील संस्मरणीय कामगिरी होय.

सरकार कडून ‘पद्मश्री’ हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला आहे. 

यासह अनेक शासकीय सन्मान मिळाले आहेत. त्यांच्या सासाय या संग्रहाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले.
मराठी साहित्य विश्वात आनंदयात्री कवी अशी बोरकरांची ओळख होती. बोरकरांच्या कवितेत विविध रूपे आढळतात. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवर्ती विषय आहेत. निसर्ग प्रतिमांनी त्यांची कविता संपन्न आहे. ( संदर्भ - मराठी विश्वकोश, गो म कुलकर्णी)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.