Britannica Student Encyclopedia

लेखांक ८ :  Britannica Student Encyclopedia
ज्ञानकोश : इंग्रजी 

लेखक - डॉ. जगतानंद भटकर
संपादक, समीक्षक, भारतीय, जागतिक साहित्य

Britannica Student Encyclopedia हा इंग्रजी भाषेतील अत्यंत महत्त्वाचा बालकोश. 


ज्या भाषेतील बालसाहित्य हे समृद्ध आणि विपुल त्या भाषेतील एकूण साहित्यालाही अपार समृद्धता लाभते. बालसाहित्याचे वाचन करणारी एक बाल आणि कुमारवयीन पिढी तुलनेने अधिक प्रगल्भ होत जाते. अशी प्रगल्भ झालेली पिढी मग साहित्याला पर्यायाने समाजाला आणि राष्ट्राला एक मूल्यात्मक आधार आणि अधिष्ठान देते. भारतामध्ये बंगाली साहित्यात विपुल असे अभिजात साहित्य आहे. बंगाली बालसाहित्यातूनच त्यांच्या प्रौढ साहित्याला वैश्विक आयाम मिळाले. बालसाहित्यात ललित साहित्य अधिक वाचकप्रिय असते.कविता आणि कथा हे बालसाहित्यातले परवलीचे साहित्यप्रकार होत.यापलीकडेही काही माहितीपूर्ण आणि बालसुलभ मनाला आकर्षित करेल असे वैचारिक साहित्य मुलांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.याच हेतूने ब्रिटानिका प्रकाशनाने Britannica Student Encyclopedia या बालकोशाची निर्मिती केली आहे. बाल-कुमारवयीन मुलांसाठी Britannica Student Encyclopedia हा बालकोश संपादित करण्यात आला असून या कोशाचे सोळा खंड आहेत. या सोळा खंडांमध्ये एकूण २२०० नोंदी अंर्तभूत आहेत. वर्णानुक्रमे या सर्व नोंदींची मांडणी करण्यात आली आहे. वैश्विकदृष्ट्या जे विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत, ज्या विषयांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची सर्वांमध्ये जिज्ञासा आहे असे काही महत्त्वाचे विषय घटक या कोशात अंतर्भूत करण्यात आले आहेत. बालकोशाचे संपादन हे तुलनेने प्रौढ अभ्यासकांसाठी संपादिलेल्या कोशापेक्षा अधिक  आव्हानात्मक असते. बालमानसशास्त्र हा विषय येथे प्राधान्याने लक्षात घ्यावा लागतो. बालसुलभ मनाला अधिक समजेल अशी ओघवती भाषा या कोशात वापरावी लागते. चित्र माध्यमाने मुलांच्या कल्पना आणि विचार क्षमता अधिक रूंदावतील अशी त्या कोशाची दृश्य मांडणी करावी लागते. Britannica Student Encyclopedia या कोशाने हे निकष सांभाळले आहेत.

मेरी रोज या या कोशाच्या संपादक आहेत. सोळा खंडातील सर्व नोंदींचे लेखन अनेक वेगवेगळ्या लेखकांकडून झाले असणार. भाषेची आणि  मांडणीची एकवाक्यता संपादक म्हणून त्यांनी जपली आहे. प्रत्येक नोंदीला चित्र दिले आहे. आकडेवारी तक्त्यांमध्ये दिली आहे. एखाद्या नोंदीतील अतिमहत्त्वाची माहिती लक्षात घेवून त्या माहितीचे स्पष्ट अधोरेखन केले आहे. देशांच्या नोंदीसोबत त्या त्या देशाचा नकाशा सुद्धा दिला आहे. प्रत्येक नोंदीला चित्र दिले असल्याने प्रत्येक नोंद आकर्षक झाली आहे. जगाची जडणघडणीत ज्या शास्त्रज्ञांनी मोलाचे योगदान दिले आहे त्या सर्व शास्त्रज्ञांच्या नोंदी या कोशात घेतल्या गेल्या आहेत. भूगोल आणि त्या विषयातील ब्रम्हांड हा उपघटक, देश,नद्या,पर्वत सरोवरे या घटकांच्या नोंदी या कोशात पहायला मिळतात. शिवाय जागतिक साहित्यात जे जे घटक बालसाहित्याशी निगडीत आहेत त्यातील परीकथा, भयकथा,शौर्यकथा,मिथ्यकथा या सर्व बाबीवर या कोशात सचित्र नोंदी घेण्यात आहेत. विज्ञान आणि त्यातील वेगवेगळे घटक लक्षात घेवून त्यावरील नोंदी घेण्यात आल्या आहेत. वैमानिकी हा विषय तर या कोशात पहायला मिळतात. शिवाय जागतिक साहित्यात जे जे घटक बालसाहित्याशी निगडीत आहेत त्यातील परीकथा, भयकथा,शौर्यकथा,मिथ्यकथा या सर्व बाबीवर या कोशात सचित्र नोंदी घेण्यात आहेत. विज्ञान आणि त्यातील वेगवेगळे घटक लक्षात घेवून त्यावरील नोंदी घेण्यात आल्या आहेत. वैमानिकी हा विषय तर या कोशात पहायला मिळतात. शिवाय जागतिक साहित्यात जे जे घटक बालसाहित्याशी निगडीत आहेत त्यातील परीकथा, भयकथा,शौर्यकथा,मिथ्यकथा या सर्व बाबीवर या कोशात सचित्र नोंदी घेण्यात आहेत. विज्ञान आणि त्यातील वेगवेगळे घटक लक्षात घेवून त्यावरील नोंदी घेण्यात आल्या आहेत. वैमानिकी हा विषय तर दृष्टीनेही हा कोश उपयुक्त आहे. महाराष्ट्र शासनाने जीवशृष्टी आणि पर्यावरण या विषयातील चार खंडाचा कुमारकोश संपादित केला आहे. त्याचा परिचय यथावकाश. 

डॉ. जगतानंद भटकर
संपादक, समीक्षक, भारतीय, जागतिक साहित्य

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.