वीरप्पन - सुनाद रघुराम
अनुवाद - प्रमोद जोगळेकर
त्याला जिवंत किंवा मृतावस्थेत पकडून देणाऱ्यास ४० लाख रुपये इनाम जाहीर झालेले होते.
वीरप्पन कसा घडला, कर्नाटक, तामिळनाडू सारकारला नमविण्याइतपत कसा फोफावला, हे कळण्यासाठी पुस्तक मुळातूनच वाचावे, असे आहे.
वीरप्पनच्या लपण्याच्या जागी एक संपादक पाहिजे तेव्हा ये-जा करू शकतो.पण प्रगत तंत्रज्ञान आणि हेलिकॉप्टर्स हाताशी असताना वर्षानुवर्षे तो पोलिसांना सापडत नाही,
सत्तेत असताना त्याचं अस्तित्व नाकारणारे सत्ताधारी सत्ता गेल्यावर त्याच्या नावाने सभाग्रहात गोंधळ घालतात. वीरप्पनला पकडण्यासाठी अनेक कृती दलांची स्थापना झाली पण प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे फार थोडे अधिकारी होते वीरप्पनला पकडण्यासाठी जीवावरचा धोका पत्करला प्रसंगी जीवाचे मोल ही दिले असे अधिकारी क्वचितच होते अनोळखी जंगलात खोलवर शिरण्याची हिंमत केलीच तर भूसुरंगाने पोलिसांच्या गाड्या उडवल्या जायच्या.
राजकुमार या प्रसिद्ध कन्नड अभिनेत्याचा त्याने अपहरण केल्यावर कर्नाटक व तामिळनाडूचे मुख्यमंत्री कायदा व न्यायालयीन प्रथा पायदळी तुडवून वीरप्पनच्या तालावर नाचू लागतात. त्यांना तळ्यावर आणण्यासाठी अखेर सर्वोच्च न्यायालयाला कडक भूमिका घ्यावी लागते हे सगळं विषण्ण करणार आहे.
राजकुमारच्या सुटकेच्या ज्या मागण्या होत्या त्यातली एक मागणी होती, टाडा अंतर्गत अटकेत असलेले ५१ कैदी आणि तामिळनाडू लिबरेशन आर्मीच्या पाच जणांच्या सुटकेची मागणी केली होती.
गेली दहा वर्षे दोन्ही सरकारांनी वीरप्पनला पकडले नाही हे लक्षात घेता हा त्याला कायद्याच्या पंजापासून दूर ठेवण्याचा सरकारी बनव नाही हे कशावरून. .? न्यायालयाच्या या प्रश्नाला सरकारकडे उत्तर नव्हते.