मी हिजडा... मी लक्ष्मी - लक्ष्मीनारायण त्रिपाठी
शब्दांकन - वैशाली रोडे.
आपण तो नाही ती आहे हे लहानपणी लक्षात आल्यावर प्रचंड घुसमटीने पुर्णपणे बदललेले आयुष्य, सहन कराव्या लैंगिक अत्याचाराच्या वेदना. अपमान, ह्यातून सावरत जगणं सुसह्य झालं ते त्याच्या घरच्या लोकांमुळे. तो हिजडा आहे हे समजल्यावर त्यांनी त्याचा त्याग केला नाही. तो जसा आहे तसा स्विकारुन आपल्यापासून दूर केलं नाही म्हणुनच हिजड्याचं जगणं जगत घरातला मोठा मुलगा म्हणून आधार बनून समाजकार्य करु शकली. डान्स क्लास चालवले. बार मध्येही काम केले. नंतर माॅडेल कोऑर्डिनेटर बनली. पुढे तिने हिजडा कम्युनिटीसाठी खूप काम केले. त्यांच्यासाठी समाजाश
भांडली, पोलिसांशी भांडली. रेशनकार्ड मिळवण्यासाठीही भांडली.
एड्स संबंधी मुंबईत झालेल्या एका काॅन्फरंन्समध्ये यु एन चे तेव्हाचे जनरल सेक्रेटरी कोफी अन्नान समोर दाई वेलफेअर सोसायटी तर्फे लक्ष्मीने भारतातील हिजड्याचचे प्रतिनिधित्व केले होते. एशिया पॅसिफिक नेटवर्क फाॅर सेक्स वर्कर्स या मलेशियन संस्थेची सदस्य म्हणून युनायटेड नेशन्सच्या सभागृहातही गेली.
देशविदेशातील अनेक परिषदेत प्रतिनिधित्व केलं.
हिजड्यांच्या ग्रुप कडून एमस्टारडॅम मध्ये इंडिया फेस्टिवलचा दिमाखदार कार्यक्रम केला. हिजड्यांसाठी भारतात सौंदर्य स्पर्धा घेतली.
लक्ष्मीने अनेक डाॅक्युमेंट्रीमध्ये, म्युझिक अल्बम मध्ये अगदी चित्रपटात सुध्दा काम केलय. न्युज चॅनेलच्या चर्चा सत्रात ती अनेकदा सहभागी झाली आहे. ती अमेरिकेत गेली होती तेव्हा तिला डिप्लोमॅटिक स्टेटस मिळालं होतं.
सुरुवातीलचा बुजरेपणा, भिडस्तपणा, त्यानंतर समाजाशी घेतलेली टक्कर, हिजडा कम्युनिटीच्या आरोग्यासाठी दिलेला लढा, त्यांच्यासाठी देश विदेशातील संघटनेमार्फत केलेले प्रयत्न.. हे सगळं या आत्मचरित्रात उलगडत जाते. शिवाय हिजड्यांचा इतिहास, दंतकथा, आख्यायिका ही ओघात येतात. वैशाली रोडे ह्यांनी परिशिष्टात अशा शारीरिकते बद्दल वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाचा आढावा घेतला आहे.
उत्तर प्रदेशातल्या एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या आणि ठाण्यात राहणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या लक्ष्मीनारायण पासून ते देश विदेशात ख्याती मिळवलेल्या सामाजिक कार्य करणाऱ्या लक्ष्मीचा अत्यंत खडतर व अचंबित करणारा प्रवास या पुस्तकातून उलगडतो.