स्वातंत्र्य दिन.. नव्या युगाची नांदी...🇮🇳
राज्यकर्त्याचे ओझे उचलण्याचे भाग्य असलेला तो माणूस सभागृहाला उद्देशून चार शब्द सांगण्यासाठी उभा राहिला. अनेक भागात पसरलेल्या दंगलींच्या मिळालेल्या संदेशाने विचलित झालेल्या नेहरूंना आपले भाषण लिहून काढण्यास वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे आता ते अंतकरणास जे जाणवेल ते उत्स्फूर्तपणे बोलणार होते. त्यांनी सुरुवात केली -
" अनेक वर्षांपूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता.त्याची आज पूर्ती सर्वांशांने नसली तरी बहुतांशाने करीत आहोत. मध्यरात्रीचा टोला पडताच सारे जग शांत झोपलेले असताना भारत स्वातंत्र्याच्या नव्या युगात जन्म घेत आहे... " एकापेक्षा एक सरस अशी शब्दयोजना नेहरूंच्या ओठातून आकार घेत होती त्यांचे शब्द लोकांना ऐकू येत असले तरी त्यांचे मन मात्र दंगलीच्या ज्वालांनी होरपळत होते.आपण काय बोलत आहोत याचे आपणाला भानच नव्हते,असे आपल्या भगिनी जवळ नेहरू नंतर म्हणाले. समारोप करताना नेहरूं बोलले, " आज आपल्या दुर्दैवाची अखेर होत आहे पुन्हा एकदा नव्या भारताचा शोध देश घेत आहे ही वेळ शूद्र व विघातक टीकेला मूठ माती देण्याची आहे. एकमेकांविषयी दृष्ट हेतू किंवा दोष ठेवण्याची नाही. आपल्याला स्वतंत्र भारताचा एक उत्तुंग असा प्रसाद उभारायचा आहे ज्यामध्ये या देशाची लेकरे सुखाने नांदतील. "
बरोबर बाराच्या ठोक्याला नेहरूनी सर्वांना विस्थापित होण्याची सूचना देऊन भारत व भारतीय जनता यांच्या सेवेस वाहून घेण्याची प्रतिज्ञा करण्याचा आदेश दिला. बाहेरच्या बाजूस पावसाच्या सरी सभागृहाच्या आसपास गर्दी केलेल्या हजारोंना भिजवून चिंब करत होत्या. मध्येच ढगांचा गडगडातही कानावर पडत होता. येत्या क्षणाची विस्मयाने वाट पाहणाऱ्या सर्वांना त्याची बिलकुल क्षिति नव्हती. सभागृहातील घड्याळाचे काटे बाराच्या आकड्यावर सरकले. सभागृहात आसनस्थ असलेल्या प्रतिनिधींच्या माना या अद्वितीय क्षणाची प्रतीक्षा करताना लवल्या होत्या. त्यांची मने शांतपणे चिंतन करण्यात घडली होती. त्यांचे काम घड्याळाच्या टोल्याकडेच लागले होते. सगळीकडे शांत शांत झाले.. घड्याळाचे काटे बारा व स्थिरावले.. घण.. घण.. नाद घुमू लागला, बसलेल्यांपैकी एकही जण हल्ला नाही. दहा.. आकरा.. बारा.. दिवस संपला. १४ ऑगस्ट संपला.. त्याचबरोबर एका युगाची समाप्ती झाली.
बाराच्या ठोक्याचा नाद घुमत असतानाच सज्जत उभ्या राहिलेल्या वादकांनी नव्या राष्ट्राच्या उदयाची ललकारी दिली..जगाच्या दृष्टीने एका कालखंडाची ती अखेर होती..
त्या कालखंडाचा आरंभ झाला होता १४९२ ला. त्याकाळी क्रिस्तोवर कोलंबसने आपले जहाज आकारले हिंदुस्तानच्या शोधात आणि तो पोहोचला मात्र अमेरिकेला. त्या शोधाची सावली साडेचारशे वर्षाच्या मानवी इतिहासावर पडत गेली. युरोपीय शासकाकडून झालेल्या गौरेतर जनसामान्यांच्या आर्थिक, धार्मिक व शारीरिक शोषणात त्याचे पर्यावसन झाले. वसाहत वाद्यांच्या कारस्थानाला अनेक जाती जमाती बळी पडल्या. युरोपियन राजसत्तांपैकी रोम, बॅबिलोन, कार्थेज, ग्रीस यांच्या तुलनेने विस्तार लोकसंख्या व प्रतिष्ठा या सर्वांच्या बाबतीत वरचढ चढणारे एक साम्राज्य ब्रिटिशांनी स्थापन केले. त्यांच्या कब्जातून आज एक उपखंड स्वतंत्र झाला. साम्राज्य मुकुटातील हा कोहिनूर गळून पडल्यानंतर इतर छोटी मोठी रत्ने किती काळ टिकणार? भारतीय स्वातंत्र्याच्या निमित्ताने मानवाच्या मुक्ती गाथेचा नवा अध्याय सुरू झाला. काल प्रवाहाच्या या लाटेला थोपवण्याची ताकद वसाहत वाल्यांकशी शिल्लक नव्हती.त्यादिवशी ललकारलेल्या त्या ध्वनीत जगाच्या युद्धोत्तर इतिहासाची नांदी उमटत होती ........🇮🇳
फ्रिडम एट मिडनाईट
लॅरी काॅलिन्स, डाॅमिनिक लापीए