तेलसम्राट

पुस्तकाचे नाव 📚 तेलसम्राट
लेखक - डॅनियल अमान 
अनुवाद मोहन गोखले

किंग ऑफ ऑईल या पुस्तकाचा अनुवाद


दुसऱ्या महायुद्धात निर्वासित ज्यू मुलगा ते अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेल्या मार्क रिच ( १९३४ - २०१३) ची ही जीवनगाथा. 

आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठे मोठे धोके पत्करणारा, मोठ्यामोठ्या रकमा पणाला लावणारा, मोठे मोठे डाव खेळणारा हा माणूस खरोखरच कोण होता, युद्ध, लढाया, क्रांती यासारख्या घटनांकडे एक व्यापाराची संधी म्हणून बघणारा हा माणूस खरोखर कसा होता, जगातल्या सर्वात ताकतवान देशाच्या गुप्तहेर संघटनेला जवळजवळ वीस वर्षे गुंगारा देणाऱ्या या माणसाचे खरे रूप कसे होते...

व्यापाराच्या निमित्ताने मार्क रीच चे संबंध असलेल्या काही देश असेही होते ज्या देशांशी अमेरिकेचे राजनीतिक संबंध बिघडलेले होते किंवा त्यांनी तोडले होते.

काही मूठभर बड्या कंपन्यांची तेल जगतावर पोलादी पकड होती. अगदी तेल उत्खननापासून ते तेल वाटप आणि पेट्रोल पंपाच्या साखळी पर्यंत सर्व गोष्टींवर त्यांची निर्विवाद पकड होती. मार्क रीचने प्रथमच सर्वस्वी वेगळी आणि स्वयंपूर्ण यंत्रणा उभी करून त्यांच्या स्पर्धेत उतरून त्यांच्या वर्चस्वाला आव्हान दिले होते. आणि स्वतः तेल सम्राट म्हणवला गेला. अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांशीही त्याचे वैयक्तिक संबंध होते. जेव्हा जेव्हा तेल संदर्भात राजनैतिक तेच प्रसंग उद्भवले तेव्हा इस्रायलच्या मोसादने पडद्यामागून सूत्रे हलवली. मार्क रीच याच्या व्यवसायिक संबंधांमध्ये मोसादने बरेच लक्ष घातले होते.अमेरिका सोडून स्वित्झर्लंडला गेल्यावर त्याच्या सुरक्षा यंत्रणेत मोसादच्या निवृत्त अधिकाऱ्यांचा मोठा सहभाग होता. इजिप्त व इस्रायल मध्ये उद्भवलेल्या एका पेचप्रसंगात मार्क रिच ने तडजोड घडवून आणली होती. त्याने केलेल्या तेलाच्या व इतर व्यापारी मदतीमुळे काही देशांच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळाले होते. 

एक निर्वासित ज्यु मुलगा ते अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्ती असा पल्ला गाठलेल्या मार्च यशोगाथा एक नमुनेदार किंवा आदर्श यशोगाथा म्हणून ओळखली जात नाही. मार्क रीच याने त्याचे साम्राज्य उभे करताना आणि पैसा कमावतांना कायदा नैतिकता किंवा अगदी प्राथमिक नीतिमत्ता कशाचीही तमा बाळगली नाही असे त्यांचे विरोधक म्हणतात. कोणत्याही देशाशी बांधिलकी नसणारा शत्रू राष्ट्रांशी व्यापार करणारा स्वतःचे असे काही निर्माण न करता दुसऱ्यांच्या व्यवहारात दलाली करून फायदा उकळणारा एक सट्टेबाज एक भांडवलदार. इराण मधील अमेरिकन वकिलातीत कर्मचाऱ्यांचे ओलीस नाट्य चालू असतानाही त्या देशाशी व्यापार करणारा, कर चूकवेगीरी चे आरोप लागल्यावर १९८३ मध्ये अमेरिका सोडावी लागणारा एक अब्जाधीश अशी त्याची प्रतिमा उभी राहिली. मग भलेही त्याने अनेक समाजोपयोगी कामे केली तरीही बिल क्लिंटन यांच्याकडून अध्यक्षपदावरून पायउतार होताना अगदी शेवटच्या क्षणी मिळालेल्या वादग्रस्त माफीचा  उपकृत अशीच मार्क रीच याची ओळख होऊन बसली आहे.

हे चरित्र लिहिताना लेखकाने मार्क रिचच्या अनेक मुलाखती घेतल्या.त्याच्या मित्रांना, देश विदेशातील व्यवसायीक संबधातल्या व्यक्तींना, आरोपपत्र दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना व त्या खटल्यासंदर्भात वकिलांना भेटून, त्यांच्याशी बोलून मार्क रिचच्या समर्थनार्थ व विरोधात असलेल्या सगळ्या कागदोपत्री पुरराव्यांचे व घटनांचे सविस्तर चित्र रेखाटून स्वतःचे मत प्रदर्शित न करता निर्णय वाचकांच्या आकलन क्षमतेवर सोडला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.