पुस्तकाचे नाव - 📚 एल्फिन्स्टन
लेखक - प्रमोद ओक
ग्रॅंट डफ ला मराठ्याचा इतिहास लिहिण्यासाठी एल्फिन्स्टनने पुष्कळ मदत केली. इतकच काय इंग्लंडला परत गेल्यावर History of India हा द्विखंडात्मक ग्रंथ लिहिला. अवहालरुपाने एल्फिन्स्टनने केलेलं लेखन ब्रिटिश इंडिया समजून घेण्याच्या दृष्टीने आजही महत्त्वाचं मानलं जातं.
शिक्षण जरी कमी असले तरी वाचनाच्या सवयीमुळे व्यासंग वाढवित असे. लढाईच्या धामधुमीत त्याचा रोजच्या वाचनात क्वचितच खंड पडायचा. पेशव्यांशी झालेल्या युध्दाच्या काळात त्याने होमरचं काव्य वाचल्याच्या नोंदी आहेत. इंग्लिश शिवाय लॅटिन ग्रीक फ्रेंच इटालियन पर्शियन उर्दू हिंदी इतकच काय मराठी या भाषा सुद्धा चांगल्या अवगत होत्या. १८२९ साली महाराष्ट्र भाषा कोश निर्मितीसाठी पुढाकार घेतला.
एल्फिन्स्टनने राजीनामा देऊन परत इंग्लडला जाण्याच्या वेळी त्याने केलेल्या शिक्षण प्रसाराचा, कार्यक्षम प्रशासनाचा यथोचित गौरव व्हावा म्हणून त्याचे स्मारक उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याचे आजचे दृश्य स्वरूप म्हणजे आजचे एल्फिन्स्टन कॉलेज ही शैक्षणिक संस्था.
हडेलहप्पी करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टनचे वेगळेपण उठून दिसते.