लेखक - कोडी मॅकफॅदियेन
अनुवाद - उदय भिडे
एफबीआय ची स्पेशल एजंट स्मोकी बॅरेट आणि तिच्या टीमने एका सिरियल किलरला शोधण्याची मोहीम राबवली त्याची थरारक कथा काही वेळा मनोविष्लेषणात्मक होते.
एका खुन्याने स्मोकीच्या घरी तिच्यावर हल्ला केला. तिचा पती आणि एकुलती एक मुलगी ह्यात मारली गेली तिने त्या हल्लेखोराला ठार मारलं. अत्यंत जखमी झालेली स्मोकी वाचली पण मानसिक धक्का बसून तिचा सगळा आत्मविश्वास ह्या घटनेने लयाला गेला. जीवलग व्यक्तींना वाचवता न आल्याने तिच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत असतात. सहा महिने तिच्यावर मानसोपचारतज्ज्ञ उपचार करीत असताना एक भयंकर बातमी तिला समजते, तिच्या शाळकरी मैत्रिणीचा अत्यंत छळ करून खुन केला आणि त्या मृतदेहालाच तिच्या दहा वर्षांच्या मुलीला जखडून ठेवले होते. त्या मुलीने आपल्या डोळ्याने छळ सहन करतांना, मरताना प्रत्यक्ष पाहिलय, नव्हे, त्या खुन्याने तिला सगळं पाहायला भाग पाडलय.
आणि त्या खुन्याने स्मोकीच्या मैत्रिणीचा खुन करतांनाची व्हिडिओ टेप पाठवून स्मोकीला आव्हान दिले. आणि स्मोकीला जगण्याचं कारण मिळतं.
स्मोकीवर उपचार करणाऱ्या मानसोपचारतज्ञ तिची मनाची तयारी बघून एफबीआयला तिला कामावर परतण्याची परवानगी देतात आणि स्मोकी आपल्या टीमसह त्या विकृत खुन्याच्या मागे लागते. त्याने कोणताही पुरावा मागे सोडलेला नसतो. मात्र अधूनमधून स्मोकीची इ मेल द्वारे हेटाळणी करीत असतो. तुला जे जे प्रीय आहे ते सगळं हिरावून घेइन. तसं होऊ नये म्हणून मला शोध.
स्मोकी आणि तिची टीम खुन्याचा शोध घेतांना अंधारात चाचपडत असतांना अजून एक अजून एका मुलीचा शारीरिक छळ करून खून करतांनांची व्हिडिओ टेप मिळते. त्याने
जो पर्यंत खुनी सापडत नाही तोपर्यंत तो तरुण मुलींचे छळ करून खून करीतच राहणार....
अत्यंत उत्कंठावर्धक कथानक असून एफबीआयच्या कामाची पद्धत विस्तृतपणे मांडली आहे. आत्मविश्वास हरवलेल्या स्मोकीच्या अवस्थेचे वर्णन सखोल मनोविष्लेषणात्मक केले असून काही प्रसंगी पाल्हाळीकसुध्दा वाटते. त्यामुळे कथानक अनेकदा संथ होते.