लेखक - जाॅन ग्रिशॅम
अनुवाद - विभाकर शेंडे
एका लाॅ फर्म मध्ये काम करीत पॅट्रिक त्याच फर्ममध्ये पार्टनर झाला होता. सुंदर बायको, दोन वर्षांच्या मुलीसह त्याचं आयुष्य मजेत चाललेलं असतांना त्याच्या गाडीचा अपघात होऊन तो मृत्युमुखी पडला. अपघात इतका भयंकर होता की त्याची गाडी जळून खाक झाली.
काही महिन्यांपूर्वी त्याने वीस लाखाचा वीमा उतरवला होता. त्यामुळे त्याचा बायकोला त्याच्या मृत्यूचा आघात पचवता आला.
पॅट्रिक च्या मृत्यू नंतर दिड महिन्यांनी तो काम करीत असलेल्या लाॅ फर्म मधून ९० दशलक्ष डॉलर्स चोरीला गेले. आणि त्याच्या पार्टनर्सला समजले तो जिवंत आहे. मेलेला नाही.
आपण कधी ना कधी पकडले जाणार हे तो जाणून होता. त्या अनुषंगाने त्याने सुरुवातीपासून तयारी केली होती. त्याची प्रेमिक इव्हा कडे त्याने पैसे सोपवले होते. चार वर्षांनी त्याचा शोध घेणऱ्या एका खासगी गुप्तहेरांच्या गटाने ब्राझील मध्ये त्याला पकडले तेव्हा एफ बी आय ला फोन करून त्याचा पकडण्याची बातमी या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्याला कळवून इव्हा गायब झाली.
एफ बी आय ने त्याला ताब्यात घेतलं तो पर्यंत त्याचा अनन्वित छळ करण्यात आला होता.
त्याच्यावर चोरी आणि खुनाचा आरोप ठेवण्यात आला. खुनाचा आरोप नाकारून त्याने त्याच्या जुन्या मित्राला आपले वकीलपत्र दिले आणि सुरु झाला एक बुध्दीबळाचा डाव...
जाॅन ग्रिशॅम ची मती गुंग करणारी रहस्यकथा.