मून एंड सिक्सपेन्स

पुस्तकाचे नाव - मून एंड सिक्सपेन्स
लेखक - साॅमरसेट माॅम
अनुवाद - जयंत गुणे


साॅमरसेट मॉम हा जन्मजात भटक्या होता. त्याच्या साहित्यानेही जगभर स्वैर संचार केला. जगातल्या बहुतेक प्रमुख भाषा त्याच्या कथा कादंबऱ्या नाटकांची भाषांतरे झालेली आहेत. 

पाॅल गाॅंग या सुप्रसिद्ध चित्रकाराच्या जीवनावरील मनुष्य त्याच्या विकारांचा आणि नियतीचा बळी असतो या साॅमरसेट माॅमच्या लाडक्या संकल्पनेवर बेतलेली असून लेखकाची सर्वात जास्त गाजलेली कादंबरी आहे. 

कथानकाचा कालावधी १८७० ते १९०० आहे. प्रकाशन १९१९ सालचे आहे. 

या कादंबरीत माॅमने पाॅल गाॅग च्या आयुष्यावर लिहितांना सत्य, ऐकीव आणि कल्पित ह्याचे मिश्रण केले त्यामुळे मुळ व्यक्तिरेखेचे नाव बदलावे लागले. प्रथम पुरुषी निवेदनाने लेखक हे कुतूहल वाढवणारं तितकच विक्षिप्त वाटणारं चरित्र उलगडत जातो. 

स्ट्रिकलॅंड दांपत्यांचं आयुष्य हे एका मध्यमवर्गीय सुखी कुटुंबासारखं होतं सुंदर गृहिणी छोट्या मोठ्या लेखकांना अधून मधून बोलवून मेजवान्या देण्याची हौस असलेली तिचा पती या हौसेला प्रतिसाद न देणारा अरसिक, पण नियतीने त्याच्यावर सोपवलेली भूमिका इमाने इतबारे वटावणारा, दोन छानशी गोंडस मुलं. मुलगा सोळा वर्षाचा तर मुलगी चौदा वर्षाची. 

असं असतांना शहरात अफवा पसरली की मि चार्ल्स स्ट्रिकलॅंड एका मुलीच्या प्रेमात पडून कुटुंबाला सोडून पॅरिसला निघून गेले. खरं तर स्ट्रिकलॅंड एकटाच गेला होता. चित्रकार बनण्यासाठी. त्याच्यासोबत कोणतीही मुलगी नव्हती. 

पॅरिसमध्ये तो अत्यंत भणंग अवस्थेत जगला. लंडनहून येणाऱ्या प्रवाशांसाठी त्याने टुरिस्ट गाईड म्हणून काम केलं. 
औषधांच्या लेबलावरील फ्रेंच मजकुराचे इंग्लिश भाषांतर करण्याचंही काम केलं. सोबत फुटकळ मजुरीही केली. 
मिळालेले बहुतेक पैसे तो चित्रकलेच्या सामानावर खर्च करीत असे. 

डर्क स्ट्रोव्ह हा पॅरिस मधलाच एक चित्रकार प्रसिद्ध चित्रकारांच्या कलाकृतींचे उपयोग नकल करणारा छोट्या छोट्या गोष्टीत अमाप उत्साह दाखवणारा काहीसा विदूषकासारखा दिसणारा. तो एकटाच होता ज्याने स्ट्रिकलॅंड मधला चित्रकार ओळखला होता. एक ना एक दिवस स्ट्रिकलॅंड च्या पेंटिंग मोठ्या किमतीत विकल्या जातील, असं म्हणायचा. 

स्ट्रिकलॅंड एकदा खूप आजारी पडला. शूश्रुषा करण्यासाठी डर्क त्याला स्वतःच्या घरी घेऊन आला. त्याने आणि त्याच्या बायकोने  केलेल्या शुश्रुषे मुळे स्ट्रिकलॅंड बरा झाला पण डर्क घर सोडून गेला कारण त्याची पत्नी स्ट्रिकलॅंड च्या प्रेमात पडली होती. स्ट्रिकलॅंड ज्या परिस्थितीत राहत होता त्या परिस्थितीत आपली पत्नी राहू शकणार नाही हे उमजून घर त्यांच्यासाठी सोडून तो बाजूला झाला. काही महिन्यातच तिने आत्महत्या केली. 

ज्या मित्राने आपली इतकी सेवा केली, आर्थिक मदत केली त्याची पत्नी आपल्यामुळे आत्महत्या करते याबाबत स्ट्रिकलॅंडला ना खंत ना खेद. नंतर पॅरिस सोडून तो तहितीला गेला. पुढची अनेक वर्षे तो तिथे राहिला. लग्न केलं. त्याने काढलेली चित्रे तिथल्या लोकांना वाटली. लगेच नाही पण काही दशकांनी त्या चित्रांना खुप चांगली किंमत मिळाली. तिथल्या गरिबीत जगणाऱ्या लोकांचं आयुष्य बदलून टाकणारी. 

स्ट्रिकलॅंड खुपदा विक्षिप्त वागायचा. आर्थिक स्थिरता असतांना घर सोडून चित्रकार बनण्यासाठी लंडनहून पॅरिसला आला तेव्हा तो स्वतः चाळीशीत होता. चित्र काढायची आवड होती परंतु शालेय जीवनानंतर कधी ब्रश हाती पकडला नव्हता. मनाने, भावनेने कुठे गुंतला नाही. उपकार कर्त्याचं घर मोडल्याचंही त्याला काही वाटलं नाही. त्याला कोणी मित्रही नव्हते. पुष्कळदा तो उपाशीपोटी असायचा. पण त्याचा लहरीपणा कमी झाला नाही. 

तो मेल्यावर चार वर्षांनी त्याच्या संबधित एक लेख वर्तमानपत्रात आला आणि त्याच्या कलाकृतींची शोधाशोध सुरू झाली. 

पाॅल गाॅंग ने काढलेलं एक पेंटिंग पंधराशे फ्रॅंकला एका प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवलं होतं. त्याच्या हयातीत कोणी घेतलं नाही. १९१७ मध्ये जिनीव्हा येथील एका युरोपियन संग्राहकाने ते घेतल्यावर शंभर वर्षांनी २०१५ साली एका लिलावात तेच पेंटिंग कतार म्युझियम साठी एका अरब शेखने २१० दशलक्ष डॉलर्सला घेतले. एखाद्या पेंटिंगला तोपर्यंत मिळालेली ती सर्वोच्च किंमत होती. 



https://www.esahity.com/ या संकेतस्थळावर हे पुस्तक इ बुक स्वरुपात मोफत उपलब्ध आहे. या पुस्तकाचा अनुवाद इतका सुरस झालेला आहे की वाचक कुठेही अडखळत नाही. हे अनुवादकाचे यश आहे. 































Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. माझ्या लाडक्या पुस्तकाची थोडक्यात माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद. पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर इतक्या वर्षांनीही वाचकांना आवडत आहे यावरून त्याची सारवत्रिकता सिद्ध होते

    ReplyDelete