अमृता प्रीतम

अमृता प्रीतम 




(३१ ऑगस्ट १९१९ - ३१ ऑक्टोबर २००५ ) 
ज्यांच्या प्रेमाला कोणतीही सीमारेषा नव्हती, ज्यांचे प्रेम जात, पात, धर्म अथवा काळाच्या चौकटीत बंदिस्त नव्हतं. त्यांच्या जीवनात जे काही घडलं ते अंतर्मनात आणि त्यानंतर ते सर्वच्या सर्व कथा, कादंबऱ्या, कवितांच्या  हवाली केलं. म्हणूनच त्याचं सर्व साहित्य अतिशय प्रभावीपणे रसिकांसमोर आले. 



आपले आयुष्य आपल्याच विचारानुसार जगणाऱ्या अमृता मुक्त होत्या, पण स्वैर नव्हत्या. आपल्याला हवं तसं जगताना त्यांनी जगाची पर्वा केली नाही. अमृताच्याच एका पुस्तकाचं नावं आहे ’अक्षरों की रासलीला ’ … किती योग्य आहे हा शब्द तिच्या रचनांसाठीही … शब्दच जणू खेळताहेत एकमेकांशी आणि घडवताहेत एक अप्रतिम काव्य !!! वीज चमकते नं क्षणभर कसा लख्ख प्रकाश दिपवतो आपल्याला तशी धारदार रचना मोहात पाडते . 



पोटात दिसामासाने वाढणारा जीव आपल्या हुंकारातून मातेला मूक साद घालत असतो. तिच्या स्वप्नांत, विचारांत, अस्तित्वात व्यापून राहिलेला असतो. ''नौ सपने'' कवितेत त्या स्त्रीची ही अवस्था अमृता सुंदर रीतीने वर्णन करते. ’परिस्थीतीपुढे शरण गेलेली तरिही स्वत्व जपणारी, खंबीर, लढावू वृत्तीची पुरो विसरणे अशक्य! अमृता प्रीतम या साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला मानकरी होत्या. साहित्य जगतातला सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार; पद्मश्री, पद्मविभूषण हे किताब तसेच देशविदेशातील अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांनी सन्मानित करण्यात आले. सहा विद्यापीठांनी डी. लिट. पदवी देवून त्यांचा सन्मान केला.

‘आवाज-ए-पंजाब’ या किताबाने त्यांना गौरविण्यात आले असून त्यांना ‘सहस्त्रकाची कवयित्री’ मानले जाते. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.