पुस्तकाचे नाव - द इलेव्हन्थ कमान्डमेन्ट
लेखक - जेफ्री ऑर्चर
अनुवाद - मोहन गोखले
‘‘तुम्ही पकडले जाणार नाही. पण जर गेलातच तर तुम्ही तुमचा सीआयए बरोबर कोणत्याही प्रकारे संबंध असल्याचं नाकाराल. काळजी करू नका. कंपनी नेहमीच तुमच्या कुटुंबाची काळजी घेईल.’’
तो गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून या आज्ञेचं पालन करीतच होता.सी ए आय चं घातक शस्र असलेला सन्मानपदक विजेता असलेला एक कुटुंबवत्सल माणूस होता. आता तो पन्नाशी जवळ असल्याने काही दिवसातच त्याची बदली कार्यालयीन कामात होणार होती.
कोलंबिया मधे निवडणुका चालू होत्या. अध्यक्षपदी जो उमेदवार निवडणूक येण्याची शक्यता जास्त होती तो अमेरिकेच्या धोरणात बसत नव्हता.त्याला संपवण्याची कामगीरी सी आय ए ने त्याच्यावर सोपवली होती. खास राष्ट्राध्यक्षांकडून त्याला विचारणा झाली होती म्हणून शेवटची म्हणून तो या कामगीरीवर रवाना झाला होता.
कोलंबियातील निवडणुकीच्या धामधुमीत झालेल्या या हत्येमुळे राष्ट्राध्यक्षांनी शोक संदेश पाठवला आणि सी आय ए च्या अध्यक्षांना विचारणा केली तेव्हा या हत्येत आपला काहीही सहभाग नाही असे म्हणत कानावर हात ठेवले. पण राष्ट्राध्यक्षांना संशय आलेला होता.
सी आय ए चा निवृत्त उपाध्यक्ष जो राष्ट्राध्यक्षांचा मित्र होता त्याला या प्रकरणाची गुप्तपणे चौकशी करायला सांगीतल्यावर काही धक्कादायक माहिती समोर आली. सी आय ए अध्यक्षांनी राष्ट्राध्यक्षांना अंधारात ठेवून अशा काही कामगीऱ्या केल्या होत्या. आणि कामगीरी पुर्ण झाल्यावर त्या एजंटला लगेच संपवले होते. आता कोलंबियातील कामगीरी बजावणाऱ्या एजंटलाही संपवणार होते. सी आय ए अध्यक्षांची महत्वाकांक्षा वाढीला लागली होती.
कोलंबियातील कामगीरी पार पाडल्यावर रशियामध्ये निवडणूका होत होत्या. तिथली कामगीरी त्याच्यावर सोपवली गेली. मात्र काही घटना अशा घडल्या की आपल्याला संपवण्यासाठी ही कामगिरी दिली गेली असं त्याला वाटू लागलं
त्याच्या निवृत्तीला काही दिवसच उरलेले असताना समोर दोन शत्रू उभे राहिले. पैकी एक शत्रू अंतर्गत होता. सी आय ए चे अध्यक्ष दुसरा शत्रू होता रशियन पोलीस. त्याला आता दोन आघाड्यांवर लढायचे होत, आणि... जीवंत राहायचं होतं....
जेफ्री ऑर्चर... खिळवून ठेवणारी थरारक कादंबरी 👍