लेखक - एस एल भैरप्पा
अनुवाद - उमा कुलकर्णी
वयाच्या चाळीशीच्या आसपास एक पुरुष व एक स्री एकमेकांच्या संपर्कात आल्यावर वाढत्या सहवासामुळे वाढीला लागलेले प्रेम आणि तिरस्काराच्या हिंदोळ्यावर झुलवणारी करणारी ही कादंबरी.
परिस्थितीच्या दडपणाने आत्महत्येसाठी प्रवृत्त होणाऱ्या मनोरुग्ण स्रीच्या मनस्वीतेबरोबरच तिच्या सहवासात आलेल्या कर्तबगार पुरुष मनाचा वेध अंतर्मुख करतो.
सोमशेखर जरी वास्तुरचनाकार होता तरी जुन्या घरांची किरकोळ दुरुस्तीची कामे करण्यात कमीपणा वाटत नसल्याने त्याने अमृताच्या बंगल्याच्या किरकोळ डागडुजीचे काम स्विकारले. बंगला जुना असल्यामुळे छत गळायला लागले होते. खर्चाचा अंदाज समजल्यावर निराश झाली. काही दिवसांनी तिने अगदी कमी खर्चात काही होतय का हे विचारल्यावर या पावसाळयात गळती थांबवता येईल पण पुढे मागे कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही तर बंगल्याचे नुकसान होईल हे समजवून त्याने एका कारागीराला घेऊन तात्पुरती डागडुजी करून दिली. इतक्या किरकोळ कामाचे पैसेही घेतले नाही.
तिने त्याला घरी चहासाठी दिलेले आमंत्रण त्याने नाकारल्यावर तिने चिडून कामाचे पैसे पाठवण्याची तयारी केली तेव्हा नाईलाजाने तो तिच्या घरी गेला.
काॅलेजात प्रोफेसर असणारी अमृता आपल्या दोन लहान मुलांसोबत मागच्या सात आठ वर्षांपासून एकटीच राहत होती. तिच्या लहानपणी वडिलांची चांगली श्रीमंती होती. आई वारल्यावर घरी तिची काळजी घेण्यासाठी आलेल्या तिच्या काकूने हळूहळू घराचा पुर्ण ताबा घेतला. वडील गेल्यावर तर व्यवसायाचाही ताबा घेऊन अमृताचे लग्न आपल्याच अर्धवट भावाशी करून दिले. दरम्यान शिक्षण पूर्ण करीत असतांना काही हितचिंतकांनी समजवल्यावर लग्नानंतर शिक्षण पूर्ण करुन तिने नौकरी करायला सुरुवात केली. वडिलांना शहरात घेतलेल्या बंगल्यात राहू लागली. तिची फसवणूक करण्यात तिचा पती ही सामील असल्याने तिने त्याला आपल्यासोबत राहू दिले नव्हते
या सगळ्या फसवणुकीमुळे तिचा स्वभाव अत्यंत संशयी आणि विक्षिप्त झाला होता. नैराश्याने तिच्या मनात वारंवार आत्महत्येचे विचार यायचे. पिस्तोल घेऊन ती रात्री अपरात्री घराजवळच्या टेकडीवर जायची. पण मुलांचे चेहरे नजरेसमोर आल्यावर परत घरी यायची.
सोमशेखरशी तिच्या गाठीभेटी वाढू लागल्या. बहुतांश दुपारचे जेवण सोबत व्हायचे. तिच्याशी बोलतांना त्याला फार सावधगिरी बाळगावी लागयची. एखाद्या शब्दाच्या अर्थाचा अनर्थ करून भांडायला लागायची. एकदा मंदिरात गेल्यावरा तिने त्याला अंगारा लावल्यावर त्याने तिला अंगारा लावला नाही म्हणून राग अनावर होऊन त्याला एकट्याला सोडून ती निघून गेली होती.
अशा विक्षिप्त स्री मध्ये गुंतता कामा नये असे ठरवायचा. पण तिचा राग शांत झाल्यावर ती मनधरणी करायला लागली की त्याचा निश्चय डळमळीत व्हायचा.... या सगळ्या गडबडीत त्याचे कामाकडे दुर्लक्ष होऊ लागले होते. आता काही वेळा तो रात्रीही तिच्या बंगल्यावर मुक्कामी राहू लागला होता.
तिच्या जुन्या मैत्रिणीच्या वडिलांनी काकूने फसवणूक केलेली इस्टेट मिळवण्यासाठी कोर्टात दावा दाखल करण्याचा सल्ला दिला.
स्वभावाला औषध नसते आणि प्रेमाला वयाचे बंधन नसते. अनेकदा अपमानित होऊनही तिचा विक्षिप्त स्वभाव समजावून घेऊन तिच्या वर मनोमन प्रेम करणारा तिला आत्महत्येपासून प्रवृत्त करणारा, तिच्या मुलांच्या भवितव्याची काळजी करणारा तो...
एक आगळीवेगळी चाकोरीबाह्य उत्कट हळवी प्रेमकथा....!