रिटर्न ऑफ किंग

पुस्तकाचे नाव - रिटर्न ऑफ किंग
लेखक - विल्यम डॅलरिंपल
अनुवाद - अंजली नरवणे, सुनिती काणे



१८३९ साली ब्रिटिश सरकार व ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांनी अफगाणिस्तानच्या राजसिंहासनावर अफगाणिस्तानचे संस्थापक अहमदशाह अब्दालीचा नातू शाहशुजा उल मुल्कला
बसवलं. त्यावेळी फारसा विरोध झाला नाही. परंतु दोन वर्षांनी वेगवेगळ्या टोळ्याच्या लोकांनी धर्मयुध्दाच्या ललकारीला जोरदार प्रतिसाद दिल्याने अफगाणिस्तानात बंड भडकलं. त्याकाळी सर्वात बलाढ्य लष्कर समजल्या जाणाऱ्या ब्रिटिश राष्ट्राचं संपूर्ण सैन्य फारशी युध्द सामग्री हाती नसलेल्या अफगाणी टोळ्यांनी नेस्तनाबूत करुन नष्ट करून टाकले. 
१८४२ साली काबूल सोडून केलेलं पलायन ही भयानक आपत्ती ठरली. 

हे सगळं का आणि कसं घडलं ह्याचा अहवाल मांडतांना मुळ संशोधन अभ्यासण्यात आली. युध्दात भाग घेतलेल्यांच्या रोजनिशी, वगैरे अनेक कागदपत्रांचा मागोवा घेतला गेला. 

प्रत्यक्षात अस्तित्वातच नसलेल्या धोक्याबद्दलच्या बनावट बातमीच्या आधारे हे युद्ध लढले गेले होते. काबुलला रशियातून केवळ एकच राजदूत आलेला होता परंतु अत्यंत महत्त्वाकांशी आणि युद्धपिपासू  गटाने ही बातमी अत्यंत भडक रंगात अतिशय वाढवून सादर केली आणि रशियाचं मोठा आक्रमण या मार्गाने भारतावर होणार आहे अशी होऊन उठवून घाबरट निर्माण केली. रशियाबद्दल प्रचंड भीती बाळगणारा इराणी वकिलातीतलि ब्रिटिश वकील जॉन मॅक्नेल यांना तेहरांहून पत्र पाठवलं जो आपल्या बाजूने उभा राहत नाही तो आपल्या विरोधात आहे असं आपण जाहीर केलं पाहिजे आपण अफगाणिस्तान वर ताबा मिळवला पाहिजे अशा प्रकारे अजिबात गरज नसलेल्या महागड्या आणि पूर्णपणे टाळता येण्याजोग्या युद्धाला प्रारंभ करण्यात आला. 

शंकास्पद कारणांनी लढल्या गेलेल्या आणि प्रचंड खर्च करून अमाप नाश घडवणाऱ्या या युद्धामुळे ब्रिटिश लष्कराच्या कीर्तीला कलंक लागला आणि ब्रिटिश सत्तेला सुरुंग लागला होता. ईस्ट इंडिया कंपनी कायमची दिवाळखोर बनवून चाळीस हजार माणसं गमावून ब्रिटिशांनी अफगाणिस्तान सोडला. 

१८५७ च्या बंडाला तोंड फुटलं तेव्हा त्याची सुरुवात खोर्द काबुल मध्ये ज्या शिपाई तुकड्यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी वाऱ्यावर सोडून दिलं होतं. अनेक हालअपेष्टा सहन करुन परत आले, त्यांच्यापासून झाली हा काही निव्वळ योगायोग नव्हता


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.