लेखक - आयर्विंग वाॅलेस
अनुवाद - विजय देवधर
जर्मनीचा हुकूमशहा हिटलरच्या संबधात इतिहासात खूप काही लिहिले गेले आहे. अनेकांनी त्याची चरित्रे लिहिली. असं असुनही ब्रिटिश इतिहास संशोधन डॉ. हॅरिसन ऍशक्राॅफ्ट ह्यांनी हिटलरचे चरित्र लिहिण्याहोते संकल्प केला होता. त्यांची इच्छा होती की आपण लिहिलेलं हिटलरचं चरित्र निर्दोष असावं म्हणून अगदी बारीकसारीक गोष्टी त्यांनी अगदी खोलात जाऊन तपासून घेतल्या होत्या. या कामात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत इतिहासाची लेक्चरर असलेली त्यांची मुलगी एमिली त्यांना मदत करीत होती.
संगळं संशोधन पुर्ण होऊन पाच वर्षांच्या अथक परिश्रमानंतर लेखन शेवटच्या टप्प्यात आले असतांना त्यांना बर्लिनमध्ये असलेल्या एका दंतवैद्याचं पत्र मिळालं. हिटलरच्या अखेरच्या काळात त्याने हिटलरला दंतवैद्यकीय सेवा दिली होती. त्यावेळी एक दात बदलेला होता. हिटलरने आत्महत्या केल्यावर त्याच्या शरीराचे काही एक्स रे रशियनांनी सार्वजनिक केले होते त्यात आणि या दंतवैद्याने जो दात बसवला होता त्यात सुक्ष्म फरक असल्याचे त्याने कळवले होते. शिवाय गळ्यात फ्रेडरिक द ग्रेट चे पदक होते ते ही सापडले नव्हते. तो मृतदेह हिटलरचाच होता याबद्दल साशंकता व्यक्त केली होती म्हणून डॉ. हॅरिसन ऍशक्राॅफ्ट ह्यांनी हिटलरच्या बंकरच्या उत्खननाची परवानगी मिळवली आणि पत्रकार परिषद घेऊन ही माहिती जाहीर केली. त्यानंतर लगेच त्यांचा अपघाती मृत्यू झाला.
त्यांची मदतनीस असलेल्या त्यांच्या मुलीने वडिलांचे अर्धवट राहिलेले हिटलरचे चरित्र पुर्ण करण्याचे ठरवले. बर्लिनमध्ये असणाऱ्या एका पत्रकाराने एमिलीला पत्र लिहून तिच्या वडिलांचा अपघातात मृत्यू झाला नसून जाणून बुजून अपघात घडवून आणल्याचं सांगितले.
किरवोव हा लेनिनग्राड मधील एका संग्रहालयाचा क्युरेटर, हिटलरने काढलेल्या पेंटिंगच संग्राहक. त्याला नुकतेच एक इमारतीचे पेंटिंग बघायला मिळाले. शैलीमुळे ते हिटलरनेच काढले असावे असा अंदाज होता. त्याला खात्री करून घ्यायची होती. युद्धकाळात उध्वस्त झालेल्या त्या इमारतीचे पुढे नवनिर्माण झाले होते त्या नव्या इमारतचं पेंटिग होतं ते.
रेक्स फोस्टर आर्किटेक्ट होता. नाझी जर्मनीने ज्या वास्तू बांधल्या त्यावर तो पुस्तक लिहित होता. महायुद्धाच्या काळात हिटलरने सात बंकर बांधले होते. त्याचे नकाशे तो शोधत होता. त्याशिवाय त्याचे पुस्तक अपुरे राहिले असते. त्यापैकी सहा नकाशे मिळाले ज्यावर ते बंकर कोणत्या ठिकाणी बांधले गेले ह्याचा उल्लेख होता. पण कालांतराने सापडलेल्या सातव्या बंकरच्या नकाशावर ठिकाणाचे नाव नव्हते.
ज्यु वरील अत्याचारांचा बदला घेणाऱ्या मोसादचे या सगळ्यांवर बारीक लक्ष होते.
मानफ्रेड म्युलर हा एका क्लबमध्ये हिटलरच्या नकला करायचा. त्याच्यात आणि हिटलरच्या दिसण्यात कमालीचे साम्य होते. जेव्हा रशियन फौजा बर्लिन मध्ये शिरल्या तेव्हा त्याला गेस्टापोंनी पकडून नेलं होतं. तो त्याच्या कुटुंबियांना परत कधीच दिसला नाही. हानाह वाल्ड ही इव्हा ब्राउनशी साम्य असणारी नटी अशीच बेपत्ता झाली होती.
एमिल ऍशक्राफ्ट, रेक्स फोस्टर, किरवोव, मोसादची एजंट तोवाह बर्लिनमध्ये एकत्रित आले. आणि या रहस्याचा शोध घेऊ लागले.
कोणीतरी होतं जे ह्यांना रोखत होतं. मारण्याचा प्रयत्न करीत होतं.
हिटलरच्या दाताचा एक्स रे, त्याने काढलेले पेंटिंग, मानफ्रेड म्युलरचं, हानाह वाल्डचं रहस्यमय गायब होणं संशय निर्माण करीत होतं की हिटलरच्या बंकरमध्ये सापडलेले मृतदेह हिटलर आणि इव्हा ब्राऊनचे नसून त्यांच्या तोतयाचे होते का...?
फ्युरर आणि त्याची प्रेयसी कदाचित अजूनही जीवंत असण्याची शक्यता होती...?
सत्य आणि कल्पिताचे अद्भुत मिश्रण असणारी ही मती गुंग करणारी रहस्यमय थरारक कादंबरी.
विजय देवधरांनी केलेला अनुवाद नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट झाला आहे.