(११ सप्टेंबर १८९५ - १५ नोव्हेंबर १९८२ )
हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. विनोबा भावे पुढे सर्वोदय नेते म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांना भारताचे राष्ट्रीय शिक्षक आणि महात्मा गांधी यांचे अध्यात्मिक उत्तराधिकारी असे म्हटले जाते. 'जय जगत' अशी घोषणा भावे यांनी दिली आहे. विनोबांनी अध्यात्मिक रचनात्मक आणि शैक्षणिक या क्षेत्रात सतत नवविचार आणि नवनवीन कर्मक्षेत्रे यांची पेरणी केली. त्यांच्या १३ वर्षाच्या पदयात्रेत त्यांनी देशात सात ठिकाणी नवीन आश्रमांची स्थापना केली. समाजातील शिक्षक आणि अन्य विचारवंत यांच्या ज्ञाननिष्ठा, विद्यार्थी निष्ठा आणि समाज निष्ठा वृद्धिंगत होऊन देशात धनशक्ती आणि शस्त्र शक्ती यापेक्षा विचार शक्तीचा प्रभाव अधिक असावा यासाठी त्यांनी आचार्य कुल ही संस्था काढली पण तिला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. विनोबांचे मराठी, उर्दू,हिंदी,गुजराती, इंग्रजी, संस्कृत या भाषांवर प्रभुत्व होते. त्यांनी अनेक संस्कृत पुस्तकांचे लोकांना वाचता येईल अशा साध्या भाषेत अनुवाद केले. विनोबा भावे कन्नड लिपीला जगातील लीपिंची राणी असे म्हणत.
विनोबांनी भगवद्गीता, बायबल, कुराण याचे समीक्षण केले.त्यांनी ज्ञानेश्वर आणि इतर संतांच्या साहित्याचे केलेले समीक्षण विशेष गाजले. त्यांनी भगवद्गीतेचे मराठीत भाषांतर केले. ते म्हणत असत गीता माझ्या जीवनाचा श्वास आहे विनोबांनी गीताईचे ७०० श्लोक लिहिले गीताईच्या २००५ या अमृत महोत्सवी वर्षापर्यंत २४४आवृत्ती निघाल्या व ३८ लाख प्रति खपल्या. ( संकलीत)