लेखक - फ्रेडरिक फाॅर्सिथ
अनुवाद - लीना सोहनी
ब्रिटन, अमेरीका, रशिया, सौदी अरेबिया मध्ये घडणारी आणि गुन्हेगारांचा मागोवा घेत युरोपमध्ये फिरवणारी अत्यंत गुंतागुंतीची थरारक रहस्यकथा.
अमेरिका व रशिया दोन्ही राष्ट्राध्यक्षांनी शस्रकपातीच्या कराराला आपसात मान्यता देऊन हा करार सिनेट कडून मंजूर करण्याची औपचारिकता बाकी असतांना ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत शिकत असलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या मुलाचे अपहरण होते. ब्रिटिश पोलीसांसह एफबीआय व सीआयएची चक्र फिरायला सुरूवात होते. अपहरणकर्त्याशी बोलली करण्यासाठी मध्यस्थ म्हणून क्वीन या माजी लष्करी अधिकाऱ्याची नेमणूक होते. या कामासाठी तो जगातील सर्वोत्कृष्ट समजला जात होता.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची मनस्थिती खराब झालेली असल्याने सगळे महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकले जातात त्यात रशियाशी होणारा शस्रकपातीच्या करारही असतो.
तिसऱ्या दिवशी अपहरणकर्त्याकडून फोन वर सुटकेच्या बदल्यात पैशांची मागणी होते. दोन आठवड्यांनी मुलाची सुटका होते. तो एफबीआय अधिकाऱ्यांकडे येत असतांना अचानक एक स्फोट होतो आणि तो मरतो. ती स्फोटके रशियन बनावटीची असल्याने सहाजिकच संशयाची सुई रशियाकडे वळते आणि अमेरिका व रशियाचे राजनैतिक संबंध बिघडायला लागते. शस्रकपात कराराला अमेरिकन राजकारणींचा विरोध वाढू लागतो.
उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना विनंती करुन क्वीन या गुन्हेगारांचा माग काढायला निघतो. त्याच्यासोबत एक एफबीआय महिला एजंटला दिले जाते. जी त्याच्या प्रत्येक हालचालीची माहिती वरिष्ठांना कळवणार होती.
क्वीन जसजसा तपास करीत तसतसा अपहरण प्रकरणात सामील असलेल्यांचा संशयीतांचे खुन व्हायला लागतात.
क्वीनच्या लक्षात येतं की अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या मुलाच्या अपहरण प्रकरण हा फक्त एक देखावा असून ह्याच्याआड एक फार मोठे षडयंत्र रचले जात आहे. ज्यात अमेरिकन राजकारणी व रशियन लष्कर सामील आहे.