रुल्स ऑफ डिसेप्शन

पुस्तकाचे नाव - रुल्स ऑफ डिसेप्शन
लेखक - क्रिस्टोफर रिच
अनुवाद - दिपक कुलकर्णी





पेशाने डॉक्टर असलेला जोनाथन हौशी गिऱ्यारोहक सुध्दा आहे. पत्नी एम्मासह तो लग्नाच्या आठव्या वाढदिवशी आल्प्स पर्वतावर गेलेला असतांना चुकलेल्या हवामानाच्या अंदाजामुळे संकटात सापडतो. जखमी एम्माला तिथेच सोडून मदत आणायला जातो. परत आल्यावर तीचा मृतदेह एका तीनशे फुट घळीत दिसते. तितक्या लांबीचा दोर नसल्यामुळे बचाव पथक परत येतं. 

दुसऱ्या दिवशी जोनाथनला एम्माच्या नावे आलेलं एक पाकीट मिळतं त्यात काही सामानाच्या पावत्या असतात. त्यानुसार तो रेल्वे स्टेशनवर ते सामान घेतो त्याचवेळी त्याच्यावर हल्ला होतो. त्या हल्यात त्याच्याकडून एक पोलीस मारला जातो. जोनाथन पळून जातो. त्या सामानात एक ओळखपत्र असते. इव्हा क्रुगर या नावाचं पण फोटो असतो एम्माचा. 

म्हणजे एम्माचं दुहेरी व्यक्तिमत्त्व होतं. इव्हा क्रुगर या नावाने ती कोणतं काम करीत होती..? गुप्तहेराचं की दहशतवाद्याचं..? 

व्हॅन डॅनिकन या स्विस पोलिस अधिकाऱ्याला एका खुनाचा तपास करतांना एका विमानावर दहशतवादी हल्ला होणार असल्याचे धागेदोरे हाती लागतात. हा हल्ला जोनाथनकडून होणार असंही त्याला वाटतं. 

आता जोनाथनच्या मागावर स्वित्झर्लंड पोलीसांसह एक पिसाट खुनी लागलाय. पोलिसांनी जोनाथनला पकडण्याच्या अगोदर त्याला जोनाथनला संपवायचं आहे. 

या सगळ्या गदारोळात जोनाथनला एम्माचं रहस्य शोधायचं आणि स्वतःला जीवंत ठेवून या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचायचं आहे. 

सी आय ए चं लक्ष इराणच्या अणू कार्यक्रमाकडे एकवटलेलं असतं. अमेरिकेची दुसरी संघटना डिव्हीजन सुध्दा या प्रकरणात सी आय ए वर मात करण्याच्या प्रयत्नात असते. दोन्ही संघटनांमध्ये श्रेयवादाचे छुपी लढाई होत असते. इस्रायला वाटत असतं की इराणचा हल्ला आपल्यावर होणार... त्या दृष्टीने त्यांची तयारी चालू असते. मित्रराष्ट्र असल्याने अमेरिका इस्रायलला सगळ्याप्रकारच्या मदतीला तयार असते. 

दावोसमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार परिषदेत इराणचा मंत्री सी आय ए ला काही गुप्त माहिती देणार होता. हे जोनाथनला समजल्यावर तो ही तेथे पोहोचला. स्विस पोलीस दल त्याच्याच प्रतिक्षेत होतं. 

अनेक वेगवेगळ्या रहस्याच्या जंजाळात अडकवून चकवा देत खिळवून ठेवणारे थरारक रहस्यमय बहुतांश स्वित्झर्लंड देशात घडणारे कथानक असले तरीही अमेरिका, इराण, इस्रायल या देशांच्या गुप्तहेर संघटनांचाही सहभाग येतो. 





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.