(१६ सप्टेंबर १९४२ - ३ ऑगस्ट २०२३ ).
महानोरांनी गद्यलेखन केलेले असले, तरी रसरशीत निसर्गभान जागविणारे कवी म्हणूनच मुख्यतः ते प्रसिद्ध आहेत. जिला अस्सल, संपन्न आणी तरल अशी ग्रामीण संवेदनशीलता म्हणता येईल, तिचा अपूर्व असा प्रत्यय त्यांच्या कवितेतून येतो. म्हणूनच पूर्वकालीन वा समकालीन कवींना प्रभावापासून ही कविता मुक्त आहे. तसेच लोकगीतांतील छंद-लय, जिवंत उत्स्फुर्तता, आपल्या मातीशी आणि बोलीभाषेच्या सहजतेशी नाते सांगणारी जिवंत शब्दकळा ही महानोरांच्या कवितेची लक्षणीय वैशिष्ट्ये त्यांच्या ह्या खास संवेदनशीलतेतून स्वाभाविकपणेच आलेली आहेत. अनुभवागणिक नवी रूपे घेणाऱ्या त्यांच्या भाववृत्तींशी सूर जमविणारी चित्रमयताही त्यांच्या कवितेत आढळते.
आधुनिक मराठी कवी. संपूर्ण नाव नामदेव धोंडो महानोर.
महानोरांचा पहिला काव्यसंग्रह, रानातल्या कविता (१९६७). त्यानंतर वही आणि पावसाळी कविता असे आणखी दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. गांधारी (कादंबरी), गपसप , गावातल्या गोष्टी ( लोककथासंग्रह) असे गद्यलेखनही त्यांनी केले आहे. त्यांनी केलेले लोकगीतांचे एक संकलनही (पळसरोडची गाणी,) प्रसिद्ध झालेले आहे.

काही चित्रपटांसाठीही त्यांनी गीते लिहिली आहेत. महाराष्ट्रातील साहित्यिक−कलावंतांने प्रतिनिधी म्हणून १९७८ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर महाराष्ट्र शासनाने त्यांची नियुक्ती केली. त्यांनाकुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार, इ.स. २००९,साहित्य अकादमी पुरस्कार, इ.स. २००० - 'पानझड',
विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार (महाराष्ट्र शासन) (२०१२) शिवाय १९९१ साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरवले. ( संदर्भ - मराठी विश्वकोश)