अगाथा क्रिस्टी

 अगाथा ख्रिस्ती 
( १५ सप्टेंबर १८९० - १२ जानेवारी १९७६ )




 ही इंग्रजी भाषेत लिखाण करणारी लेखिका होत्या. जगभरातील रहस्यकथा प्रेमींना रहस्यात गुंगवणारी.पहिलं पुस्तक प्रसिद्ध झालं ते पहिलं महायुद्ध संपल्या संपल्या. तिथून पुढे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातलं जग तिच्या पुस्तकांतून व्यक्त होत राहिलं. अगाथा ज्या काळात या कथा लिहीत होती त्या काळातील जागतिक घडामोडींचे संदर्भ, अर्थातच ब्रिटिश आणि युरोपियन दृष्टिकोणातून यात सतत येत राहतात. किंबहुना तिच्या जगाविषयीच्या अनुभवांचं हे सार असतं. पुरातत्त्वशास्त्रज्ञ पतीमुळे अगाथाला मेसोपोटेमिया, इजिप्त अशा पुरातत्त्वसमृद्ध भागांतलं वास्तव्य लाभलं आणि ते तिच्या कथांमधून उतरलं. 

१९३४ मध्ये प्रथम प्रसिद्ध झालेल्या ‘मर्डर ऑन ओरिएण्ट एक्सप्रेस’मध्ये तर आशिया खंड ते युरोप खंड अशा रेल्वे प्रवासात त्या वेळचे अनेक देश, तिथल्या वृत्ती-प्रवृत्तींसह, सूक्ष्म राजकीय, प्रशासकीय संदर्भासहित डोकावतात. ब्रिटनमध्ये घडणाऱ्या घटनांमध्ये हिंदुस्तानातल्या स्वातंत्र्य चळवळीच्या गरम वाऱ्यांच्या झुळकादेखील मधूनच जाणवतात. अमेरिकन आणि ब्रिटिश प्रवृत्तींमधला विसंवाद, अस्मितांची टक्कर बोलण्यात खेळकरपणे पण सहेतुक येत असते.


रहस्यकथेत रहस्याची उकल एकदा झाली की मग वाचकाच्या लेखी त्या रहस्यकथेचं अस्तित्व संपतं, एकदा वाचून झालं की दुसऱ्यांदा वाचण्यात रस राहत नाही, असा एक सामान्य अनुभव असतो. पण हिचकॉकचे चित्रपट  जगातले असंख्य प्रेक्षक पुन:पुन्हा पाहतात हा अनुभव आहे.नेमका हाच अनुभव अगाथा ख्रिस्तीची पुस्तकं देतात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.