लेखिका - ऍनी झैदी
अनुवाद - सुनंदा अमरापूरकर
ऍनी झैदी यांना २०१९-२० चा नाइन डाॅट्स पुरस्कार मिळालेला आहे. समकालीन सामाजिक प्रश्नांबद्दल निर्मितीक्षम विचार प्रसूत करणाऱ्यांना तो दिला जातो.
ऍनी झैदी या पत्रकार असून त्याच नजरेने त्यांचे लहानपणापासूनचे अनुभव या पुस्तकात लिहिले आहेत.
घर या शब्दाचा अर्थ शोधताना ऍनी जैदी भारतातल्या अशा काही वेगवेगळ्या ठिकाणांपाशी वाचकांना घेऊन जातात.
जिथे त्यांना स्वतःची ओळख गवसली. त्यांचा जन्म झाला त्या शहराचं नाव आता बदललं आहे.
ज्या औद्योगिक वसाहतीत त्या लहानाच्या मोठ्या झाल्या ते तिला आपलं वाटण शक्यताच नव्हती. गुंडगिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या तिच्या पूर्वजांच्या आझमगड जिल्ह्यातील मुहम्माबाद या छोट्या गावापासून ते ती सध्या राहत असलेल्या मुंबई महानगरापर्यंत झैदी वाचकांना एक सूक्ष्म दृष्टिकोन देतात की एक अल्पसंख्यांक आणि स्थलांतरित म्हणून इतर समाज तुमच्याबद्दल नेहमी परका बाहेरचा असाच दृष्टिकोन ठेवतो कारण तुम्ही मागे सोडून आलात तो ठाव ठिकाण एकतर दुपळा झालेला असतो किंवा ओळखू न येणे इतका बदललेला असतो.
उत्तर प्रदेशातील राजकीय आश्रयने गुन्हेगारी कशी वाढत गेली. आणि सत्तेत सहभागी झाल्यावर याच गुन्हेगारांनी सरकारवर दबाव आणून आपल्यावरचे सगळे आरोप मागे घ्यायला भाग पाडले याची आकडेवारी त्या देतात. भाषेच्या बाबतीतही राष्ट्रीय स्तरावरील प्रांतीक व बोलीभाषा याचीही सरकारी आकडेवारी त्या देतात.
मुस्लिम समाजातील पालकांना शिक्षणाचे महत्त्व फारसे पटले नाही, तिथे पुढची पीढी अर्धशिक्षित किंवा एकांगी विचारधारेची निपजणार हे सहाजिकच आहे. यासाठी मुलांना मुख्य धारेतलं शिक्षण जेवढं गरजेचं आहे तितकच गरजेच मागच्या दशकात वाढलेल्या जातीय विभाजनाला समजवून घेण्यात आहे.
तुम्ही कुठून आलात यासारखे प्रश्न हे पुष्कळ वेळा कोण आहात तुम्ही असेच असतात. तुम्हाला सांस्कृतिक, राजकीय आणि वैयक्तिक मूल्य व्यवस्था यावरून तोललं जातं या सगळ्यांना शेवटी आकार येतो तो भौगोलिक स्थानाच्या बाहेर असलेल्या संकल्पना पर्यंत.