लेखक - फ्रेंडरिक फोरसाइथ
अनुवाद -अशोक पाथरकर
ऑर्गनायझेशन डेर एहेमलिगेन एस एस आंगेहोरिगेन या शब्दांच्या आद्याक्षरांवरून बनलेल्या ओडेसा हा शब्द म्हणजे जर्मनीच्या एस एस च्या माजी सभासदांची संघटना.
सैन्याला समांतर असलेल्या या एस एस संघटनेकडून हिटलरने अनेक कायद्यात न बसणाऱ्या कामगिऱ्या बजावून घेतल्या होत्या. १९३३ ते १९४५ च्या दरम्यान नाझीच्या खास कामगिऱ्या फत्ते करणे ही एस एस संघटनेची जबाबदारी होती. या कामगिऱ्या करतांना जवळपास दोन कोटी ज्यू लोकांची हत्या केली होती. त्या काळात एस एस ही दोन अक्षरे आणि त्यांचे चिन्ह अमानुषपणाचे दुसरे नाव होते.
महायुद्ध संपण्यापूर्वीच एस एस च्या बहुतेक सर्व वरिष्ठ सभासदांना आपण हे युद्ध हरणार आणि तसे झाल्यावर आपली चौकशी होईल तेव्हा सुसंस्कृत लोक आपल्या कृत्याकडे कसे बघतील याची जाणीव होती. त्यामुळे त्यांनी बेपत्ता होऊन नवे आयुष्य जगण्याची तयारी करून ठेवली होती. केवळ क्रमांकाने ओळखल्या जाणाऱ्या बँकेतील खात्यात पैसे जमा करून ठेवले होते, खोटी ओळखपत्रे बनवून ठेवली होती, आणि पाळण्याचे मार्ग निश्चित करून ठेवले होते. दोस्त राष्ट्रांनी जेव्हा अखेरीस जर्मनीवर विजय मिळवला तेव्हा एस एस चे बहुतेक लोक अदृश्य झाले होते. पळून जाण्याची योजना हाताळण्यासाठी त्यांनी जी संघटना स्थापन केली होती तिचे नाव होते ओडेसा.
ओडेसा ची जी काही उद्दिष्टे होती त्यात एस एस चे पुनर्वसन करणे, राजकीय पक्षात शिरकाव करणे, एस एस च्या मारेकऱ्यांना कायदेविषयक मदत मिळवून देणे व परत नाझींची सत्ता स्थापन करणे हे होते.
ओडेसा ला तिचे उद्दिष्ट साध्य करण्यात थोडे फार यश मिळते न मिळते तोच एका जर्मन पत्रकाराने असा काही धक्का दिला की ओडेसा मोडकळीला आली.
पीटर मिलर एक फ्री लान्स पत्रकार होता. रात्रीच्या वेळी पोलिस गाडीच्या मागे जात एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची त्याला माहिती मिळाली. त्या व्यक्तीच्या बाबतीत दुसऱ्या दिवशी त्याच्या पोलीस खात्यातील मित्राने माहिती दिली सोबत त्या व्यक्तीची डायरी दिली. ती डायरी वाचल्यावर पीटर रोशमनचा शोध घेऊ लागला जो रिगा या छळछावणी चा प्रमुख होता आणि रिगाचा खाटिक म्हणूनही ओळखला जायचा.
मोसादने अशा काही लोकांवर कारवाई केली होती. पण रोशमन त्यातूनही बचावला होता. कारण ओडेसा संघटना त्याला वाचवत होती.
पीटर मिलरला अनेकांनी हे प्रकरण सोडण्याचा सल्ला दिला. नंतर त्याला धमक्याही मिळाल्या. पण पीटरने सगळ्यांना धुडकावून लावले. त्याला रोशमन हवा होता. जणू काही जुना हिशोब चुकवायचा होता.
या कादंबरीवर आधारीत सिनेमा प्रदर्शित झालेला आहे.