लेखिका - मृणालिनी चितळे
सत्यघटनेवर आधारित ही एक काल्पनिक कादंबरी आहे. हिमालयन गीऱ्यारोहकांमध्ये जाॅर्ज मेलरीचं नाव आजही आदराने घेतलं जातं. १९२४साली ब्रिटिश सरकारने प्रायोजित केलेल्या माऊंट एव्हरेस्टच्या चढाई अभियानात ते बेपत्ता झाले होते. त्यांचे प्रेत मात्र १९९९ साली सापडले.
या पंचाहत्तर वर्षांच्या दरम्यान घडणारे हे कथानक आहे.
डेनिस आणि एमिली चा मुलग विल्यम उर्फ विली वयाच्या पाचव्या वर्षापासून पोहण्याच्या शर्यतीतले जुने विक्रम मोडीत काढीत नवे विक्रम प्रस्थापित करीत होता. वयाच्या बाराव्या वर्षी तो आत्याला भेटला तेव्हा पहिल्यांदा त्याने आपल्या आजोबांच्या गिर्यारोहनाबद्दल ऐकलं. जरी एव्हरेस्टवर चढाई करण्यात त्यांना अपयश आलं होतं तरीही लोक अजूनही त्यांचे नाव आदराने घेत होते. त्यांच्या एव्हरेस्टच्या मोहीमाबद्दल ऐकल्यावर विली आता पाण्यापासून दुर जाऊ लागला, ऊंच ऊंच डोंगर त्याला खुणावू लागले. अशातच आत्याने त्याला भारतात येण्याबद्दल विचारलं होतं. तिला आयुष्यात एकदा तरी एव्हरेस्ट शिखरांचे दर्शन घ्यायचं होतं ज्या शिखरांमध्ये तिचे वडील बेपत्ता झाले होते. विली आनंदाने हुरळून गेला. आज बेसकँप पर्यंत जाणार होता. भविष्यात केव्हा तरी एव्हरेस्टवर जाण्याची संधी मिळणार होती. वडीलांची नाराजी पत्करून तो आत्यासोबत जाऊन आला पण आता त्याच्यात आणि वडीलांच्या मध्ये दुरावा निर्माण होऊ लागला म्हणून त्याने आई वडिलांपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. आता तो पैसेही जमा करणार होता. एव्हरेस्टवर जाण्यासाठी.
कथानकाच्या ओघात दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेष, काळ्या लोकांवर होणारे अत्याचार प्रभावी पणे येतात. एका मिश्रवंशीय मुलीच्या प्रेमात तो पडतो.
काही वर्षांनंतर तो जेव्हा एव्हरेस्टवर जाण्यासाठी तिथल्या शिबीरात दाखल होतो तेव्हा आपल्या आजोबांना मिळणारा सन्मान बघून चकीत होतो.
प्रत्यक्ष ट्रेकिंग करतांनाचा थरार रोमांच उभे करतो. हा थरार मांडताना लेखिका कुठेही कमी पडलेल्या नाहीत. स्वतः गिर्यारोहक असल्याने ट्रेकिंग च्या वर्णणात अनोखा जीवंतपणा जाणवतो.
विली जेव्हा एव्हरेस्टवर चढाई करून परत येतो तेव्हा काठमांडू विमानतळावर त्याच्या स्वागतासाठी आलेल्या आईवडीलांना, पत्नीला बघून झालेला अवर्णनीय आनंद नकळत आपलेही डोळे ओलावतो.
त्यानंतरची एव्हरेस्ट मोहीम विली नाकारतो. त्याची आत्या, वडील, आर्थिक मदतीसाठी तयार असतात तरीही... कारण त्याची पत्नी गरोदर असते म्हणून.
जाॅर्ज मेलरीच्या एव्हरेस्ट मोहीमेवर आधारीत "पाथ ऑफ ग्लोरी" हे जेफ्री ऑर्चर लिखित पुस्तकात १९२४ सालच्या एव्हरेस्ट मोहिमेची कहाणी वाचनीय आहे.
,