लेखक - उमेश कदम
लेखक १९९८ पासून आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस साठी युद्धविषयक कायद्याचे विभागीय कायदा सल्लागार म्हणून काम पाहतात. प्रसिद्ध लेखक बाबा कदम यांचे ते चिरंजीव आहेत.
व्हिएतनाम युध्द हे अमेरिकेच्या इतिहासातील एक काळे कुट्ट पान आहे.
दुर्बलांवर राज्य गाजवण्याच्या महात्त्वकांक्षेपोटी माणूसपणाला टाचेखाली कसे चिरडले जाते याचे विदारक वर्णन म्हणजे सत्यघटनेवर आधारित ही कादंबरी.
१६ मे १९६९ या दिवशी अमेरिकन सैन्याच्या चार्ली कंपनीच्या तीस जणा़च्या तुकडीने क्रांतिकारकांना मदत करायचे या संशयावरून व्हिएतनाम मधील मी लाय या खेड्यातील सुमारे एकशेचाळीस निरपराध लोकांची,ह्यात तान्ही बाळं सुध्दा होती हत्या करून क्रुरतेचा कळस गाठला. या सत्य घटनेवर आधारलेली ही कहाणी आहे.
ऑपरेशन चिकहील नाव असलेल्या या कारवाईचे नेतृत्व केले होते जॉर्ज हॅले याने. हे हत्याकांड काहीसे उशीराने उघडकीस आले. काही महिन्यांनंतर या तुकडीच्या फोटोग्राफरने सैन्यातील नौकरीचा राजीनामा दिल्यानंतर वाॅश्गिंटन पोस्ट च्या संपादकांच्या मदतीने ही कहाणी जगासमोर आणली. त्याच्याकडे दोन कॅमेरे होते. एक लष्कराचा, दुसरा स्वतःचा खाजगी. लष्कराच्या कॅमेऱ्याने त्यांना अधिकाऱ्यांना हवे असलेले फोटोज घेतले पण स्वतःच्या कॅमेऱ्याने मात्र अत्याचार होणारे सगळेच फोटो घेतले होते.

या फोटोंमुळे अमेरिकेची नाचक्की होउन सर्व जगात खळबळ माजली. अमेरिकेच्या व्हिएतनाम युध्दातल्या सहभागाच्या विरोधातल्या जनअंदोलनाला धार चढली.सरकारने अगोदर हे दडपण्याचा प्रयत्न केला पण जनअंदोलनासमोर मान तुकवून चौकशी समिती नेमली. समीतीने दिलेल्या अहवालानुसार जाॅर्ज हेली व त्यांच्या दोन सहकाऱ्यांचे कोर्टमार्शल होवून फाशीची शिक्षा सुनावली परंतु अपीलात सुटका झाली.
त्या हल्यात एकही जण जीवंत राहू नये असा जोरदार हल्ला केला पण एक पाच वर्षाची मुलगी दैवयोगाने हल्ल्यातून वाचली. हा नियतीने घेतलेला बदला होता. या हत्याकांडाची ती एकमेव साक्षीदार होती. त्या दिवशी सगळे सैन्य निघून गेल्यावर तिने आईलडीलांचे निर्जीव देह शोधून काढले. शोक गस्त अवस्थेत दुसऱ्या खेड्यात राहणाऱ्या नातेवाईकांकडे जायला निघाली. भविष्यात हिच मुलगी मारल्या गेलेल्या आपल्या निष्पाप गावकऱ्यांना न्याय देणार होती.

व्हिएतनाम मधील युद्ध संपण्याच्या प्रक्रियेत नी लाय हत्याकांडाचा अप्रत्यक्षरीत्या हातभार लागला. केवळ त्याच्यामुळेच अमेरिकेतल्या जनमताचा प्रवाह बदलला आणि सरकारवरचा दबाव वाढला. यथावकाश अमेरिकेला आपलं सैन्य मायदेशी बोलवावं लागलं.
व्हिएतनाम मधील अमेरिकन अत्याचारावर प्रकाशझोत टाकणारी अमेरिकेची काळी बाजू उघड करणारं, इतिहासाचे दुर्लक्षित दालन म्हणजे ही कादंबरी. कथानका मध्ये वास्तव व कल्पित याचा संयोग साधून आधुनिक इतिहासातला एक अविश्वासनीय वाटावा असा विदारक आणि हृदय भेदक नाट्यपूर्ण अध्याय मराठी वाचकांसमोर आणतांना पात्रांची नावे बदलली असून मी लाय या ऐवजी नी लाय असे स्थळाचं नामकरण केले असले तरीही या सत्यघटनेची दाहकता कमी होत नाही.

या हत्याकांडास जबाबदार असलेला जाॅर्ज हॅले ला न्यायालयाने निर्दोष सोडल्यावर काही वर्षांनी नेवाडा राज्यातील एका पोलीस ठाण्यात चोरीच्या आरोपावरून लाॅकअप मधे होता. एका पत्रकाराने त्याला ओळखून तो या दयनीय अवस्थेत कसा पोहचला हे शोधून काढलं.