मानसिक आघात समजून घेताना

पुस्तकाचे नाव - मानसिक आघात समजून घेताना
लेखिका - डॉ. वृषाली रामदास राऊत





आजच्या धकाधकीच्या जीवन जगतांना मानसिक संतुलन ठेवताना मार्गदर्शक ठरणारे पुस्तक. या पुस्तकात मानसिक आघाताच्या विविध पैलूंचे सखोल विश्लेषण केले आहे. 

मराठी भाषेत मानसशास्त्र या  गुंतागुंतीच्या विषयाबद्दल कमी पुस्तकं लिहिली गेली आहेत. ती ही क्लिष्ट वाटतात. या पुस्तकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते वैज्ञानिक शोध आणि वैद्यकीय अभ्यासावर आधारित असूनही, सहज सुलभ भाषेत लिहिले गेले आहे.

पहिल्या प्रकरणातच लेखिकेने स्वतःचे मानसिक आघाताचे अनुभव अगदी मोकळ्या मनाने व्यक्त केले आहेत. त्यात त्यांचा खंबीरपणा, आत्मविश्वास प्रकर्षाने दिसतो. 

जवळच्या व्यक्तीचा  मृत्यू हा आघात सहन करताना अनुभवायला येणारी शोक ही भावना शरीर व मन यावर कसा परिणाम करते हा सहसा न बोलला जाणारा विषय या पुस्तकात सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं आहे. 

मानसिक आघात म्हणजे अशी एखादी घटना ज्यामुळे आपल्या मेंदूची कार्यप्रणाली बदलते, आपल्यात असुरक्षितपणाची भावना वाढीस लागून मनात भीती बसते.
मानसिक आघातानंतर जाणविणाऱ्या कठीण भावना हाताळताना बहुतेक वेळी चुकीच्या मार्गांचा वापर केला जातो ज्यामुळे व्यसन लागत व गुन्हे घडू शकतात. 

निव्वळ गोळ्या घेऊन मानसिक आघात बरा होत नाही तर अनेक प्रकारचे उपचार त्यात वापरले जातात. त्यातही कुटुंबीयांचे सहकार्य फार महत्वाचे आहे. 
सर्वात महत्वाचे ज्या व्यक्तीने मानसिक आघात अनुभवला आहे त्याला आपल्याला काहीतरी त्रास आहे हे जाणवायला हवे. त्रासावर उपचार आवश्यक करण्याची इच्छा हवी. 

यावर PTSD ( Post traumatic stress disorder) मानसिक आघातानंतर जाणविणारा ताण कसा येतो यावर शास्त्रोक्त माहिती व उपचार या  पुस्तकात दिले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.